Alarm bells | राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढू लागले, महाराष्ट्र कोरोना अपडेट्स

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : राज्यात आज पुन्हा एकदा कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. राज्यात आज दिवसभरात एकुण  02 हजार 172 रूग्णांचे निदान झाले आहे. अनेक महिन्यांनंतर राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यामुळे राज्यासमोर धोक्याची घंटा (Alarm bells) वाजू लागली आहे.

राज्यात आज दिवसभरात 22 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात राज्यात एकुण 01 हजार 98 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आजअखेर राज्यात 65 लाख 04 हजार 831 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज अखेर 01 लाख 11 हजार 232 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 910 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. Alarm bells, Corona patients are on the rise in the state, Maharashtra Corona Updates

राज्याची चिंता वाढवलेल्या ओमिक्रॉनने आज महाराष्ट्राला मोठा दिलासा दिला. राज्यात आज दिवसभरात एकही रूग्ण आढळून आला नाही. सध्या राज्यात सक्रीय ओमिक्रॉन रूग्णांची संख्या 167 इतकी आहे.

राज्यात आज अखेर 11 हजार 492 सक्रीय रूग्णांची संख्या झाली आहे.  राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.65 टक्के आहे. तर मृत्यू दर 2.12 टक्के इतका आहे.

राज्यात सर्वाधिक रूग्ण मुंबई परिसरात आहेत. राज्यात गेल्या काही महिन्यांनंतर आज कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. एकाच दिवशी दोन हजारपेक्षा जास्त रूग्ण सापडू लागल्याने राज्याच्या चिंता आता वाढल्या आहेत. राज्यात तिसऱ्या लाटेचे हे संकेत तर नाहीत ना ? अशी भीती आता व्यक्त केली जाऊ लागली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाची काय स्थिती ?

अहमदनगर जिल्ह्यात आज अखेर सक्रीय कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 410 इतकी आहे. आज 48 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यात आजअखेर बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 51 हजार 271 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.89 टक्के आहे. दरम्यान, आज जिल्ह्यात 16 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात 16 नवे रूग्ण

अहमदनगर जिल्ह्यात आज दिवसभरात 16 नवे रूग्ण आढळून आले आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 02, खाजगी प्रयोगशाळेच्या तपासणीत 09 आणि अँटीजेन चाचणीत 05 रुग्ण असे 16 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले.

यामध्ये अकोले 02, श्रीगोंदा 02 अहमदनगर मनपा 03, कर्जत 02, अहमदनगर ग्रामिण 02, पारनेर 01, पाथर्डी 02, शेवगांव 01, नेवासा 01 अशा 16 रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 04, अकोले 01, जामखेड 02, नगर ग्रा. 18, पारनेर 03, पाथर्डी 02, राहाता 01, राहुरी 02, संगमनेर 06, शेवगाव 01, श्रीरामपूर 05 आणि इतर जिल्हा  03 अशा रुग्णांचा समावेश आहे.