जामखेड : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्षपदी युवराज पाटील यांची निवड

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । राज्यातील ग्रामसेवकांच्या न्याय हक्कांसाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या अहमदनगर जिल्हा संघटनेची नुकतीच बैठक संपन्न झाली.अहमदनगर येथे पार पडलेल्या बैठकीत कार्यकारिणी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्षपदी युवराज पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

Election of Yuvraj Patil as Ahmednagar District Working President of Maharashtra State Gram Sevak Union

युवराज (दादा) गोकुळ पाटील हे सध्या जामखेड तालुक्यात ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ते गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनमध्ये कार्यरत आहे. उत्तम संघटन कौशल्य असलेल्या पाटील यांच्या खांद्यावर जिल्हा कार्याध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे.

जामखेड तालुक्यातील सर्व ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी यांचे युवराज पाटील यांचे सातत्याने सहकार्य असते.  पाटील यांच्या निवडी बद्दल अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामसेवक संवर्गामधून आनंद व्यक्त होत आहे.

युवराज पाटील यांची महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ग्रामसेवक संघटनेचे सोलापुर येथील नेते लक्ष्मण तात्या गळगुंडे पाटील, अहमदनगर जिल्हाध्यक्ष एकनाथ ढाकणे, जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी अभिनंदन केले आहे.