Bhaskar More arrest news : अखेर रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटर या शिक्षण संस्थेचा (Ratnadeep Medical Foundation and Research Centre) अध्यक्ष असलेल्या डाॅ भास्कर मोरेला बेड्या ठोकण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. भास्कर मोरेला अटक (Arrest) होताच अंदोलक विद्यार्थ्यांनी जामखेडमध्ये (jamkhed) जोरदार जल्लोष केला. विनयभंगाचा गुन्हा (Bhaskar more Crime of molestation) दाखल झाल्याच्या दिवसापासून डाॅ भास्कर मोरे हा फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके कार्यरत होती.अखेर त्याला अटक करण्यात आले आहे.(Bhaskar More arrested)
रत्नदीप शैक्षणिक संकुलाच्या मनमानी कारभाराविरोधात तसेच भास्कर मोरेला अटक करावी या मागणीसाठी रत्नदीपच्या शेकडो विद्यार्थ्यांचे जामखेडमध्ये अंदोलन सुरू आहे. या अंदोलनाच्या 9व्या दिवशी अंदोलक विद्यार्थ्यांची आमदार प्रा.राम शिंदे (Ram Shinde mla) यांनी भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.भास्कर मोरेला तातडीने अटक करावी अशी भूमिका यावेळी विद्यार्थ्यांनी आमदार राम शिंदे यांच्यासमोर मांडली.
अंदोलनस्थळी आमदार प्रा.राम शिंदे (Ram Shinde mla) हे बुधवारी तळ ठोकून होते. सायंकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आमदार प्रा.राम शिंदे यांना दूरध्वनीवरून फरार भास्कर मोरेला अटक करण्यात आल्याची माहिती दिली. भास्कर मोरेला अटक झाल्याची माहिती मिळताच आठ दिवसांपासून अंदोलन करत असलेल्या शेकडो विद्यार्थ्यांनी अंदोलनस्थळी जोरदार जल्लोष केला.टाळ्यांच्या कडकडाटात या कारवाईचे त्यांनी स्वागत केले.
जामखेड येथील रत्नदीप मेडिकल फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे याच्याविरोधात दि. ८ मार्च रोजी मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थीनीने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून भास्कर मोरे हा फरार झाला होता.डॉ. भास्कर मोरे याला स्थानिक गुन्हे शाखेने भिगवन इंदापूर येथून ताब्यात घेतले आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली आहे.
दरम्यान अहमदनगर पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार व नियोजनानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकाने मोठ्या शिताफीने डॉ. भास्कर मोरे याला इंदापूर तालुक्यातील भिगवन येथून अटक केली आहे. या अटकेमुळे विद्यार्थ्यांच्या अंदोलनास मोठे यश आले आहे.