ब्रेकिंग न्यूज : आमदार प्रा. राम शिंदे ॲक्शन मोडवर येताच राज्य सरकारने उचलले मोठे पाऊल, रत्नदीप प्रकरणी सरकारने स्थापन केली उच्चस्तरीय चौकशी समिती !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड शहरात गेल्या आठ दिवसांपासून रत्नदीप शैक्षणिक संकुलातील (Dr Bhaskar More) विद्यार्थ्यांनी हाती घेतलेल्या अंदोलनास आमदार प्रा.राम शिंदे यांनी बुधवारी भेट दिली.या भेटीनंतर ॲक्शनमोडवर आलेल्या आमदार प्रा.राम शिंदे (Ram Shinde mla) यांनी मुख्यमंत्र्यांसह संबंधित खात्याच्या मंत्र्यांचे विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्याय अत्याचाराकडे लक्ष वेधताच सरकारने या अंदोलनाची गंभीर दखल घेतली. सरकारने रत्नदीप प्रकरणी अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 15 सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. त्याचबरोबर डाॅ भास्कर मोरे याला अटक करण्यात आली आहे.

government took big step as MLA Ram Shinde came into action mode, maharashtra government constituted high-level inquiry committee in Ratnadeep medical college case, dr bhaskar More news jamkhed today,

रत्नदीपमधील शेकडो विद्यार्थ्यांनी रत्नदीप शैक्षणिक संकुलातील गैरकारभाराविरोधात तसेच या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डाॅ भास्कर मोरेंविरोधात आक्रमक अंदोलन हाती घेतले आहे. या अंदोलनाच्या 9व्या दिवशी आमदार प्रा.राम शिंदे यांनी अंदोलनास भेट दिली. यावेळी आमदार शिंदे यांनी अंदोलक विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी कथन केलेल्या व्यथा ऐकून आमदार प्रा.राम शिंदे हे यावेळी हेलावून गेले होते.

shital collection jamkhed

यावेळी आमदार प्रा.राम शिंदे यांनी रत्नदीपमधील विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाची, अत्याचाराची आणि आर्थिक लुटमारीची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत दिली. तसेच घटनेचे गांभीर्य त्यांच्या निदर्शनास आणून दिले. तातडीने सदर संस्थेवर कठोर कारवाई करावी त्याचबरोबर डाॅ भास्कर मोरेला अटक करावी, अशी आक्रमक मागणी त्यांनी केली.

government took big step as MLA Ram Shinde came into action mode, maharashtra government constituted high-level inquiry committee in Ratnadeep medical college case, dr bhaskar More news jamkhed today,

यावेळी आमदार राम शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, तातडीने उच्चस्तरीय समिती नेमून 15 दिवसाच्या आत चौकशी केली जाईल,  कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, कठोर कारवाई केली जाईल, असा शब्द त्यांनी अंदोलकांना दिला.

मुख्यमंत्र्यांनी आमदार प्रा.राम शिंदे व अंदोलक विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यांना शब्द देऊन काही तास उलटत नाही तोच अहमदनगरचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने रत्नदीप प्रकरणी चौकशी समिती गठीत केली. याबाबतचा आदेशही जारी झाला आहे. रत्नदीपमधील विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्याय व अत्याचाराची आमदार प्रा.राम शिंदे यांनी अतिशय गंभीरपणे दखल घेत सरकारचे लक्ष वेधले.

आमदार शिंदे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे विद्यार्थ्यांच्या अंदोलनास अंदोलनाच्या 9व्या दिवशी मोठे यश मिळाले. रत्नदीप प्रकरणी सरकारची चौकशी समिती स्थापन झाली आहे. त्याचबरोबर डाॅ भास्कर मोरे यालाही अटक करण्यात आली. आमदार प्रा.राम शिंदे हे ॲक्शन मोडवर येताच विद्यार्थ्यांच्या अंदोलनाला बुधवारी सायंकाळी मोठे यश मिळाले आहे.

government took big step as MLA Ram Shinde came into action mode, maharashtra government constituted high-level inquiry committee in Ratnadeep medical college case, dr bhaskar More news jamkhed today,

रत्नदीपच्या चौकशीसाठी सरकारने अहमदनगर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 15 सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे.या समितीत कर्जतचे प्रांताधिकारी हे सदस्य सचिव असणार आहेत. या समितीत सदस्य म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक, सुवर्णा माने उपवनसंरक्षक अहमदनगर, जिल्हा शल्यचिकित्सक अहमदनगर, जिल्हा आरोग्य अधिकारी अहमदनगर, नरहरी कळसकर, डाॅ मनिष इनामदार, संदिप कुलकर्णी, प्रा संदिप पालवे, प्राचार्य जी वाय दायमा, डाॅ विशाल पांडे, एच एस जोशी, प्राचार्य जी. व्ही गर्जे,  जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अहमदनगर यांचा समावेश आहे. सदर समिती रत्नदीप प्रकरणी आलेल्या सर्व तक्रारींची 15 दिवसाच्या आत सखोल चौकशी करून शासनास अहवाल सादर करणार आहे.

government took big step as MLA Ram Shinde came into action mode, maharashtra government constituted high-level inquiry committee in Ratnadeep medical college case, dr bhaskar More news jamkhed today,