Dr Bhaskar More Jamkhed : रत्नदीप प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करा – मुख्यमंत्र्यांकडे सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख । रत्नदिप शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी आणि विद्यार्थीनींचे शोषण करणाऱ्या डाॅ भास्कर मोरेला (Dr Bhaskar More Jamkhed) तातडीने अटक करावी त्याबरोबर रत्नदिप प्रकरणाची SIT मार्फत सखोल चौकशी करावी, अशी मागणी मुंबई येथील सामाजिक कार्यकर्त्या स्नेहल कांबळे (Snehal Kamble Mumbai) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. (Investigate Ratnadeep case through SIT)

Dr Bhaskar More Jamkhed, Investigate Ratnadeep case through SIT, Mumbai-based social activist Snehal Kamble demand to Chief Minister Eknath Shinde and Home Minister Devendra Fadanvis, jamkhed news today,

रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटरच्या वतीने वैद्यकीय शिक्षणासंबंधीचे विविध काॅलेजेस् जामखेड तालुक्यातील रत्नापुर येथे चालवले जातात.रत्नदीप शैक्षणिक संकुलात राज्यभरातील शेकडो विद्यार्थ्यी शिक्षण घेतात. संस्थापक डाॅ भास्कर मोरेंकडून गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थी आणि विद्यार्थीनींची आर्थिक, मानसिक, शारीरिक छळवणूक, पिळवणूक केली जात असल्याच्या तक्रारी होत्या. त्यावर वेळीच गंभीर दखल घेण्यात आली नाही. यातून भास्कर मोरे याच्या मनमानी कारभाराला बळ मिळाले. ‘आपण सांगु तोच कायदा आणि नियम’ याच्या तालावर तो विद्यार्थ्यांना नाचवत होता. (Bhaskar More Jamkhed News)

मागील वर्षी भास्कर मोरे विरोधात एका विद्यार्थीनीने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. तिच्या या बंडात सहभागी इतर मुलींना त्याने प्रचंड त्रास दिला.या प्रकरणात तो जामिनावर बाहेर आहे. त्यानंतर मोरेचे दृषकृत्य थांबतील असे वाटले होते, परंतू त्यात आणखी वाढ झाली. विद्यार्थ्यांवर दहशत निर्माण करण्यासाठी तो काॅलेजमध्ये सर्रास बंदुक घेऊन मिरवत होता. भीतीपोटी विद्यार्थी त्याचा अत्याचार सहन करत होते. भास्कर मोरे हा आर्थिक शोषणाबरोबरच विद्यार्थीनींचे मानसिक आणि शारीरिक शोषणही करायचा.त्याच्या याच पापकृत्याचा घडा भरला आणि मंगळवारी याचा भडका उडाला. त्याच्या विरोधात शेकडो विद्यार्थ्यांनी आक्रमक अंदोलन हाती घेतले आहे. (Bhaskar More Jamkhed News)

Dr Bhaskar More Jamkhed, Investigate Ratnadeep case through SIT, Mumbai-based social activist Snehal Kamble demand to Chief Minister Eknath Shinde and Home Minister Devendra Fadanvis, jamkhed news today,

डाॅ भास्कर मोरेविरोधात गेल्या आठ दिवसांपासून जामखेडमध्ये विद्यार्थ्यांचे आक्रमक आंदोलन सुरु आहे. या अंदोलना दरम्यान भास्कर मोरे विरोधात आणखीन एका विद्यार्थीनीने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर हरीण पाळल्याप्रकरणी वन्यजीव कायद्यानुसार वनविभागाने गुन्हा दाखल केला आहे. गेल्या पाच दिवसांपासून भास्कर मोरे हा फरार झालेला आहे. त्याच्या अटकेसाठी जामखेड पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळी पथके कसून शोध घेत आहेत. अजूनही त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलेले नाही. (Bhaskar More Jamkhed News today)

विद्यार्थ्यांच्या आक्रमक अंदोलनाची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, डाॅ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणारे रायगड, महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळ यांच्या समितीने विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या. त्यानंतर समितीने रत्नदीप शैक्षणिक संकुलास भेट देऊन पाहणी केली.यात या समितीला अनेक धक्कादायक गोष्टी आढळून आल्या. विद्यार्थ्यांनी जे आरोप संस्था आणि संस्थाचालक भास्कर मोरेंवर केले होते त्यात तथ्य असल्याचे चौकशी समित्यांच्या निदर्शनास आले. पुणे विद्यापीठाच्या सत्यशोधन समितीने रत्नदीपमधील सहा लॅब सील करण्याची कारवाई केलेली आहे. (Bhaskar More Jamkhed News)

नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने डॉ. मिलिंद आवारे, डॉ. मनीष इनामदार, डॉ. वाय. प्रवीण कुमार यांनी मंगळवारी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेत तक्रारीची गांभीयनि दखल घेत असल्याचे स्पष्ट केले, दरम्यान, महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळ समितीच्या वतीने डॉ. प्रेरणा राठोड, डॉ. के. बी. लढाणे, वाय. एम. दांडगे यांनी सांगितले की, संस्थेतील मुलींना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या आहेत. संस्थेची मान्यता रद्द करण्यात येणार आहे. यानंतर दोन्ही समितीच्या वतीने रत्नदीप संस्थेला भेट दिली. याबाबतचा अहवाल दोन्ही विद्यापीठाच्या कुलगुरू दिला जाईल, तसेच राज्यपालांनाही अहवाल सादर केला जाणार असल्याचे समिती सदस्यांनी स्पष्ट केल्यानंतर विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. (Bhaskar More Jamkhed News)

Dr Bhaskar More Jamkhed, Investigate Ratnadeep case through SIT, Mumbai-based social activist Snehal Kamble demand to Chief Minister Eknath Shinde and Home Minister Devendra Fadanvis, jamkhed news today,

रत्नदीपच्या विद्यार्थ्यांनी हाती घेतलेल्या अंदोलनास राजकीय व सामाजिक संघटनांचा तसेच नागरिकांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा वाढला आहे. शिव प्रतिष्ठाण हिंदुस्थानचे तालुकाध्यक्ष पांडुरंग भोसले यांचे उपोषण सुरु आहे. फरार भास्कर मोरेला अटक करावी या मागणीसाठी विद्यार्थी आक्रमक आहेत. आज अंदोलनाचा 9वा दिवस आहे. भास्कर मोरेच्या काळ्या कारनाम्यांच्या निषेधार्थ जामखेड शहरात बुधवारी सकाळपासून बंद पाळला जात आहे. रत्नदीपच्या विद्यार्थ्यांनी क्रुरकर्मा भास्कर मोरे विरोधात हाती घेतलेल्या लढाई जामखेडकरांचा सक्रीय पाठिंबा वाढला आहे. सकाळपासून जामखेड बंदला मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. (Bhaskar More latest News)

दरम्यान, रत्नदीप प्रकरणाचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले आहे. रत्नदीप प्रकरणाची सखोल चौकशी होऊन क्रूरकर्मा भास्कर मोरे विरोधात कठोर कारवाई व्हावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुंबई येथील सामाजिक कार्यकर्त्या स्नेहल कांबळे यांनी रत्नदीप प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करून भास्कर मोरेविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार व राजेश टोपे यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या स्नेहल कांबळे यांनी गंभीर आरोप केले आहेत. भास्कर मोरे हा पवार आणि टोपे यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे.रत्नदीप प्रकरणात सरकार SIT ची घोषणा करणार का? याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. (Dr Bhaskar More News)

Dr Bhaskar More Jamkhed, Investigate Ratnadeep case through SIT, Mumbai-based social activist Snehal Kamble demand to Chief Minister Eknath Shinde and Home Minister Devendra Fadanvis, jamkhed news today,

रत्नदीपचे विद्यार्थी आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या आठ दिवसांपासून अंदोलन करत आहेत. अंदोलक विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोशल.मीडियातून मोहिम राबवली आहे. त्यांनी आपले गाऱ्हाणे ट्विटर (x) द्वारे टविट करत सरकारपर्यंत पोहचवले आहे. विद्यार्थ्यांना काॅलेज बदलून हवे आहे. रत्नदीपमध्ये जो काही छळ अत्याचार झाला त्याला कंटाळून विद्यार्थ्यांना आता काॅलेज बदलून हवे आहे. नियमापेक्षा जास्त घेतलेली फी परत हवी आहे. त्याचबरोबर भास्कर मोरेला अटक करावी अशी अंदोलक विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे. यावर तातडीने तोडगा काढण्यासाठी सरकारला ठोस पाऊले उचलण्याची आवश्यकता आहे. (Bhaskar More Jamkhed News)

shital collection jamkhed