अहमदनगर जिल्ह्यात 500 जणांची होणार ‘आपदा मित्र’ म्हणून निवड, कोणाची निवड होणार ? नोंदणीसाठी अर्ज कुुठे करायचा? जाणून घ्या सविस्तर !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, अहमदनगर यांच्यामार्फत अहमदनगर जिल्ह्यात ‘आपदा मित्र’ योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्हयातील पाचशे स्वयंसेवकांची आपदा मित्र म्हणून निवड करण्यात येणार आहे.

500 people will be selected as Disaster Friends from Ahmednagar District, Ahmednagar District Disaster Management Authority invites applications for registration.

आपदा मित्रांना 8 ते 10 दिवसांचे निवासी आपत्कालीन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षित आपदा मित्रांना ओळखपत्र, गणवेश तसेच आपत्कालीन प्रतिसाद किट (Emergency Response Kit) देण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करण्‍याचे आवाहन जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणातर्फे करण्यात आले आहे.

आपदा मित्र होण्यासाठी या आहेत अटी

  • आपदा मित्र नेमणूकीसाठी उमेदवार 18 ते 40 वयोगटातील असावा.
  • माजी सैनिक, सेवानिवृत्त वैदयकीय व्यावसायिक, स्थापत्य अभियंते यांना वयाचा निकष शिथिल केला जाऊ शकतो.
  • उमेदवार अहमदनगर जिल्ह्यातील स्थानिक रहिवासी असावा,
  • तो किमान सातवी पास असावा.
  • त्याचे शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य चांगले असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
  • आधार कार्ड असणे आवश्यक
  • आपत्ती प्रतिसाद कार्यात स्वयंसेवा करण्याचा पूर्वीचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
  • महिलांचा पंचवीस टक्के सहभाग असावा.
  • नेहरू युवा केंद्र, एनसीसी,एनएसएस व भारत स्काऊट गाईड यांच्यामधून वीस टक्के नोंदणी करण्यात येईल.
  • सेवानिवृत्त सैनिक, अग्निशमन विभाग, होमगार्ड, सिव्हील डिफेन्समध्ये कार्यरत व्यक्तींना भरतीमध्ये प्राधान्य दिले जाईल.

आपदा मित्र म्हणून नोंदणी करण्यासाठी खालील गुगल फॉर्मच्या लिंकला क्लिक करा आणि गुगल फॉर्म भरा

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeGnjyOiiLEr2GrVRa76YS8FycPJ1Nlw6nGpfDMHyeQQJdJnQ/viewform

वरिल गुगल फॉर्मची लिंक ahmednagar.nic.in या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.