आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नायगावात पार पडले आरोग्य तपासणी शिबिर !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नायगाव ग्रामपंचायतच्या सदस्या संध्या सोनवणे यांच्या पुढाकारातून आज नायगावमध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन पार पडले.

On the occasion of MLA Rohit Pawar's birthday, today health check-up camp was held in Naigaon, jamkhed news

नायगाव येथील पंचक्रोशी महाविद्यालयातील विद्यार्थिनी आणि गावातील महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शालेय मुलींमध्ये रक्ताचे प्रमाण कमी आढळल्यास या मुलींना भविष्यात अनेक शारीरिक तक्रारींना सामोरे जावे लागते. आजाराचे प्रमाण वाढते. याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

On the occasion of MLA Rohit Pawar's birthday, today health check-up camp was held in Naigaon, jamkhed news

यावेळी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ,सरपंच सुवर्णा उगले, भजनावळे, शाळेचे मुख्याध्यापक साळवी सर, ग्रामसेवक स्वाती पटेकर, युवराज उगले, चंद्रकांत उगले, विनोद उगले,नितीन ससाणे, सचिन उगले, गजानन उगले,महेश सोनवणे, शंकर खैरे उपस्थित होते.