Jal Jeevan Mission | जल जीवन मिशन अंतर्गत खर्ड्याला 15 कोटी तर मिरजगावला 23 कोटी मंजुर, रोहित पवारांच्या प्रयत्नांना यश

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । Jal Jeevan Mission ।जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत जामखेड (Jamkhed) तालुक्यातील खर्डा (kharda) व कर्जत (karjat) तालुक्यातील मिरजगाव ( Mirajgaon) या दोन मोठ्या गावांना पाणीपुरवठा विभागाकडून भरघोस निधी मंजूर झाला आहे.

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत जामखेड तालुक्यातील खर्डा व मिरजगाव येथे नळ पाणीपुरवठा योजनेस पाणीपुरवठा विभागाने प्रशासकीय मंजुरी दिली आहे.

खर्डा योजनेसाठी 14 कोटी 63 लाख रुपये निधी मंजूर केला आहे. तसेच कर्जत तालुक्यातील मिरजगावच्या पाणीपुरवठा योजनेस 22 कोटी 85 लाख रुपये निधी पाणी पुरवठा विभागाने मंजूर केला आहे. .

कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी यासंबंधी वारंवार पाठपुरावा करून पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Water Supply Minister Gulabrao Patil) यांच्या सोबत चर्चा केली होती. त्यांच्या प्रयत्नांची दखल घेत मतदारसंघातील पाण्याची अडचण लक्षात घेऊन पाणी पुरवठा विभागाने यास मंजुरी दिली आहे. यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

पूर्वी अनेक योजनांमध्ये विविध गावे, वाड्या वस्त्या या वंचित राहिल्याने त्यांना अनेक योजनांचा लाभ मिळू शकलेला नाही. परंतु आमदार रोहित पवार यांनी योग्य सर्वेक्षण करून वाड्यावस्त्यांवरील पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल या अनुषंगाने या योजना सरकारकडून मंजूर करून घेतल्या आहेत, यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.