120 कोटींच्या आराखड्यास शासनाची मंजुरी, रोहित पवारांच्या पाठपुराव्याला यश, कर्जत जामखेड मतदारसंघातील विजेची समस्या होणार दूर !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । कर्जत-जामखेड मतदारसंघात विज वितरण हानी कमी करण्यासाठी 53.76 कोटी तर वीज वितरण प्रणालीत सुधारणा करण्यासाठी 66.76 कोटी रुपये अशा एकूण 120.48 कोटी रुपयांच्या आराखड्याला शासनाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी आज दिली.

120 Crore scheme approved by government, Rohit Pawar's follow-up success, problem of electricity in Karjat Jamkhed constituency will be removed,

शासनाच्या प्रणाली सुधारणा पद्धत (Revamp Distribution sector scheme) या योजनेतून चिलवडी व चौंडी येथे नवीन वीज उपकेंद्राला मंजुरी मिळाली आहे. तसेच मिरजगाव, भांबोरा, खांडवी, कुळधरण, भाणगाव येथील उपकेंद्राची क्षमता वाढवण्याला देखील शासनाने मंजुरी दिली आहे.

कर्जत -जामखेड मतदारसंघातील विजेची समस्या दुर व्हावी यासाठी आमदार रोहित पवार यांनी शासन दरबारी जोरदार पाठपुरावा केला होता. त्यानुसार नायगाव, दिघोळ व घुमरी येथे नवीन उपकेंद्राला मंजुरी मिळाली होती व राशीनच्या वीज उपकेंद्राची क्षमता वाढवण्याला ही मंजूरी मिळाली होती. यापैकी काही कामे पूर्ण झाली आहेत तर काही सध्या निविदा स्तरावर आहेत. 

शेतकऱ्यांच्या विजेच्या बाबतीत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी रोहित पवार यांनी 6 कोटींपेक्षा अधिकचा आमदार निधी देखील यापुर्वी वापरला आहे. नवीन वीज उपकेंद्र मंजूर झाल्याने व पूर्वीच्या उपकेंद्राची क्षमता वाढवल्याने मतदारसंघातील विजेचा लपंडाव हा पूर्णपणे संपणार आहे. यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.