टाटा समुहाचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू !

मुंबई  :  मुंबई- अहमदाबाद महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात टाटा समुहाचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचे आज (दि. ४) दुपारी सव्वा तीनच्या सुमारास निधन झाले. पालघरजवळील चारोटी येथे दुभाजकावर कार आदळल्याने हा भीषण अपघात झाला. त्यांच्या गाडीमध्ये चार जण होते. या अपघातात मिस्त्री यांच्यासह आणखी एक जणाचा मृत्यू झाल्याची माहिती पालघरचे जिल्हा पोलीस प्रमुख बाळासाहेब पाटील यांनी माध्यमांशी बाेलताना दिली.

Former chairman of Tata Sons Cyrus Mistry died in an accident near Mumbai palghar, Cyrus Mistry accident news,

सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) हे मर्सिडिस गाडीतून अहमदाबादवरुन मुंबईला येत असताना हा अपघात झाल्याचे पाटील यांनी सांगितले. दुभाजकाला गाडी धडकल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. अपघातात दोघांचा मृत्यू झाला. तर इतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांची २०१२ साली टाटा सन्सच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यानंतर २०१६ साली त्यांनी या पदावरुन हटविण्यात आले होते. या संदर्भात सायरस मिस्त्री यांनी या निर्णयास आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मार्च २०२१ मध्ये याबाबत सर्वोच्च न्यायालयाने सायरस मिस्त्री यांच्या विरोधात निकाल दिला होता. या निकालाचा पुनर्विचार केला जावा, अशी याचिका सायरस मिस्त्री यांच्यातर्फे शापूरजी पालोनजी समुहाने दाखल केली होती. मात्र पुन्हा न्यायालयाने आपला पुर्वीचाच निकालास योग्य ठरवले हाेते.