Warning of heavy rains | सावधान पुढील काही तास धोक्याचे : जामखेडसह अहमदनगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Warning of heavy rains | हवामान विभागाकडून जामखेडसह संपुर्ण अहमदनगर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.शनिवार व रविवारी अहमदनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. जामखेड तालुक्यात शनिवारी दुपारपासून काही भागात विजांचा कडकडाट सुरू होता. दिवसभर प्रचंड उकाडा निर्माण झाला आहे. हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस धोक्याचे असणार आहेत.( Warning of heavy rains in Ahmednagar district including Jamkhed Beware of danger for the next few hours)

हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार  उत्तर मध्य महाराष्ट्र, मध्य मराठवाडा भाग, पालघर पुणे आणी विदर्भातील काही भागात मध्यम ते तिव्र ढग दिसत असल्याचे सांगण्यात आले आहे. या भागात पुढील 3 ते 4 तासात विजांच्या गडगडाटासह अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला. तसेच अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस सुरू झाला आहे. या संदर्भात हवामान शास्त्रज्ञ के एस होसळीकर यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

हवामान विभागाने जारी केलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर जामखेड तालुक्यातील नागरिकांनी दक्षता घ्यावी असे अवाहन जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे. कुठे काही दुर्घटना घडल्यास तातडीने प्रशासनाला संपर्क करण्याचे अवाहन करण्यात आले आहे.

जामखेड तालुक्यातील ‘या’ गावात विज कोसळून बैल जागीच ठार

अहमदनगर शहरात तुफान पाऊस

अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून विसर्ग सुरू

अहमदनगर जिल्हयातून वाहणा-या गोदावरी नदीस नाशिक जिल्हयातील नांदुरमधमेश्वर बंधा-यातून 6,310 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे व भिमा नदीस पुणे जिल्हयातील विविध धरणांच्या विसर्गामुळे दौंड पुल येथे 8,222 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

तसेच अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण व निळवंडे धरणातून पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. तर ओझर बंधा-यातून प्रवरा नदीपात्रात 1,093 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. मुळा धरणातून मुळा नदीपात्रात सदयस्थितीत 4,255 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

घोड धरणातून घोड़ नदीपात्रात 5,400 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर सिना धरणातून सिना नदीपात्रात 6.22 क्युसेस व खैरी धरणातून 4,68 क्युसेस विसर्ग सुरू आहे.

जिल्हयातील पर्जन्यमानामुळे वा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यास धरणाच्या पाणीसाठयात वाढ होऊन पर्यायाने नदीपात्रातील विसर्गात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्हगातील नदीकाठच्या गावातील नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अवाहन

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे जिल्हयातील तमाम नागरिकांना आवाहन करण्यात येते कि. स्थानिक प्रशासनाव्दारे दिलेल्या सुचनांचे पालन करावे. सखल भागात राहणा-या नागरीकांना तातडीने सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावेत. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्र तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे व सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. नदी अथवा ओढे नाल्यावरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास पुल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करु नये. जुनाट/ मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये. धोकादायक झालेले तलावाचे क्षेत्रामध्ये राहण्या-या नागरिकांचे तातडीने सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे.

अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहण्या-या लोकांनी दक्षता घ्यावी वेळीच सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे. धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणा-या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरु नये. अचानक नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यास जिवीतास धोका उदभवू शकतो. धोकादायक ठिकाणी चढू अथवा उतरु नये, धोकादायक ठिकाणी सेल्फी (Selfie) काढू नये.

मदतीसाठी खालील नंबरवर संपर्क साधावा

मेघगर्जना होत असताना झाडांच्या खाली न थांबता सुरक्षीत ठिकाणी आश्रय घ्यावा. विदयुतवाहीनी अथवा ट्रान्सफॉर्मरजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या विदयुत तारा, विदयुत खांबापासून दूर रहावे. आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दुरध्वनी क्र. 1077 (टोल फ्री) 0241-2323844 वा 2356940 वर संपर्क साधावा असे अवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.

web titel : Warning of heavy rains | Warning of heavy rains in Ahmednagar district including Jamkhed Beware of danger for the next few hours