lightning strike | जामखेड तालुक्यातील ‘या’ गावात विज कोसळून बैल जागीच ठार

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : lightning strike | जामखेड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पावसाची बॅटिंग सुरू आहे. हवामान विभागाकडून शनिवारी व रविवारी विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. या इशाऱ्यानुसार तालुक्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसात एक दुर्घटना समोर आली आहे.

जामखेड तालुक्यातील पिंपळगाव आळवा येथे वीज कोसळण्याची घटना समोर आली. या घटनेत वीज कोसळून बैलाचा जागेवर मृत्यू झाला आहे. सुदैवाने कुठलीही मानवी हानी झाली नाही. पिंपळगाव आळवा येथे शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास वीज कोसळण्याची घटना घडली. या घटनेत उत्तम लक्ष्मण मोहिते यांचा 55 हजार रूपये किमतीच्या बैलाचा जागेवर मृत्यू झाला. (bull was killed in lightning strike at Pimpalgaon Alwa in Jamkhed taluka )

हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी

अगामी तीन चार जामखेड तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्याला हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. ऑक्टोबर हिटमुळे पडत असलेला पाऊस हा विजांच्या कडकडाटासह पडत आहे. अचानक काही भागात अतिमुसळधार पाऊस होत आहे.  पावसाचे वातावरण झाल्यावर नागरिकांनी योग्य त्या दक्षता घेणे आवश्यक आहे. तालुक्यातील सर्व प्रकल्प आता ओव्हरफ्लो आहेत. नदी व ओढ्याकाठच्या नागरिकांनी योग्य खबरदारी घेण्याचे अवाहन प्रशासनाने केले आहे.

अहमदनगर शहरात तुफान पाऊस पहा व्हिडीओ

 

web titel : lightning strike | bull was killed in lightning strike at Pimpalgaon Alwa in Jamkhed taluka