Warning of heat waves | सावधान : अहमदनगरसह राज्यातील अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । राज्यात उन्हाळ्याचा प्रकोप वाढू लागला आहे. त्यातच येत्या पाच दिवसांत राज्यात उष्णतेची तीव्र लाट (Warning of heat waves) येणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. (Warning of heat wave in many parts of Maharashtra including Ahmednagar district in next five days)

हवामान विभागाच्या मुंबई केंद्राने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या 28 मार्च ते 1 एप्रिल या पाच दिवसांत राज्यात उष्णतेची लाट येणार आहे. पुढील पाच दिवस नागरिकांनी दुपारच्यावेळी उन्ह्यात जाऊ नये असा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेला उष्णतेचा इशारा खरा ठरत आहे. राज्यातील अनेक भागातील पारा 40 पार होऊ लागला आहे. सोमवारी जामखेड तालुक्यात उष्णतेचा पारा 39 पार झाला होता. दिवसभर प्रचंड ऊन आणि उकाड्याने नागरिक हैराण झाले होते.

दरम्यान पुढील तीन दिवसांत पश्चिम हिमालयीन प्रदेश आणि गुजरातकडून उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात अहमदनगरसह जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी अन्य जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट तीव्र जाणवेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

तसेच मध्य प्रदेशचा पश्चिम भाग, विदर्भ, राजस्थान आणि दक्षिण पंजाब, दक्षिण हरियाणा, बिहार, झारखंड, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 29 ते 31 मार्चदरम्यान उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

जळगाव जिल्ह्यात 29 मार्च ते 31 मार्च हे तीन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.उष्णतेच्या लाटेत उष्माघातासारख्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी दुपारी उन्हात न जाण्याच्या सुचना हवामान विभागाकडून करण्यात आल्या आहेत.