Petrol – Diesel Prices Today | पेट्रोल-डिझेलची अच्छे दिनकडे वेगाने आगेकूच सुरू

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । petrol – diesel prices today | देशातील पाच राज्यांच्या निवडणूका संपल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होऊ लागली आहे. आज पुन्हा डिझेल व पेट्रोलच्या दरात भडका उडाला. यामुळे सर्वसामान्यांची खिसे महागाईच्या झळांनी होरपळून निघत आहेत. (Fuel price hike continues, petrol – diesel prices today )

देशात इंधन दरवाढीने उच्चांक गाठला आहे. आज पेट्रोल 85 पैसे तर डिझेल 75 पैश्यांनी वाढले आहे. यामुळे आता  एक लीटर पेट्रोलचे दर 115 रूपयांवर जाऊन ठेपले आहेत. तर एक लिटर डिझेलचा दर शतकाच्या उंबरठ्यावर (99.25) आला आहे. येत्या दोन दिवसांत डिझेल मोठ्या दिमाखात शतक साजरे करणार आहे. डिझेलच्या आयुष्यातील हा सुवर्ण दिन ठरणार आहे. Petrol and diesel prices continue to rise sharply today,