Vinod Khute News : विनोद खुटेच्या कंपनीविरुद्ध ईडीची पुन्हा एकदा मोठी कारवाई, ईडीने जप्त केली 38 कोटी 50 लाख रूपयांची मालमत्ता !

Vinod Khute News : ईडीने विनोद खुटे विरोधात मोठी कारवाई केली आहे.विनोद खुटेच्या ‘व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीज’ची (VIPS) दुबईतील मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने मुख्य आरोपी विनोद खुटे (Vinod Khute ed) याची 38 कोटी 50 लाख रूपयांची मालमत्ता जप्त केली आहे. लाखो गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या विनोद खुटेचा पाय आता आणखीन खोलात गेला आहे.ईडीने अत्तापर्यंत 80 कोटी 8 लाखांची मालमत्ता जप्त केली आहे. (Vinod Khute ed raid) विनोद खुटे व त्याच्या साथीदारांना ईडी कधी अटक करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

देशभरातील गुंतवणूकदारांना जास्त व्याजाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून करोडोंची माया जमा करणाऱ्या विनोद खुटे याच्या विरोधात ईडीने कारवाई हाती घेतली आहे. ईडीने विनोद खुटे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. ईडीने यापुर्वी पुणे, मुंबई आणि अहमदाबादमध्ये छापेमारी केली होती. त्यावेळी विविध बँकांमधील 23 कोटींची रक्कम ईडीकडून गोठवण्यात आली आहे. त्याचबरोबर ‘फेमा’ अंतर्गत 18.54 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. ईडीने अत्तापर्यंत 80 कोटी 8 लाखांची मालमत्ता जप्त केली आहे. हा पैसा हवाला रॅकेट आणि शेल कंपन्यांच्या माध्यमातून विदेशात तसेच दुबईला पळविण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. (vinod khute news today)

अंमलबजावणी संचालनालयाने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट (पीएमएलए), 2002 च्या तरतुदींनुसार तात्पुरता संलग्नक आदेश जारी केला असून, व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीजचे मालक विनोद खुटे यांची 37.50 कोटी रुपयांची विदेशी मालमत्ता जप्त केली आहे.संलग्न मालमत्ता स्थावर मालमत्तेच्या स्वरूपात आहे ज्यात विनोद खुटे यांच्या मालकीचे दुबई येथे 37.50 कोटी रुपयांचे विविध फ्लॅट्स आहेत असे ईडीने म्हटले आहे. (Vinod Khute latest news)

काना कॅपिटलच्या ब्रोकरेजमध्ये विविध गुंतवणूकदारांकडून १२५ कोटी रुपयांचा निधी गोळा केल्याचा आरोप तपास एजन्सीने केला आहे. विनोद खुटे हा गुंतवणूकदारांची फसवणूक करुन दुबईत फरार झाला आहे. दुबईत त्याचे अनेक फ्लॅट्स असल्याची माहिती समोर आली आहे. त्याविरोधात कारवाईसाठी ईडीने पाऊले उचलली आहेत.(Vinod Khute latest news)

ईडीने विनोद तुकाराम खूटे, संतोष तुकाराम खूटे, किरण पितांबर अनारसे, मंगेश सिताराम खूटे, अजिंक्य बडधे याच्यासह त्यांच्या साथीदारांविरुद्ध भादवि कलम 420, 471, 34, 120 ब अन्वये भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात 9 ऑक्टोबर 2023 रोजी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ‘ईडी’चे संचालक रत्नेशकुमार भुवनेश्वर कर्ण (वय ४३) यांनी फिर्याद दिली आहे. हा सर्व प्रकार आंबेगाव येथील सिंहगड कॉलेज जवळ असलेल्या निर्माण विवा सोसायटीमध्ये घडला होता. (Vinod Khute latest news)

‘ईडी’च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी २०२० साली ‘व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनी’ आणि ‘ग्लोबल एफिलेट बिझनेस’ या कंपन्या सुरू केल्या होत्या. या कंपन्यांच्या माध्यमातून सर्व सामान्य लोकांना दरमहा जास्त व्याजदराने परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. ‘चेन मार्केटिंग’ सारखी ‘पॉन्झी स्कीम’ चालवीत लोकांकडून कोटींवधी रुपयांच्या ठेवी स्वीकारण्यात आल्या होत्या. (Vinod Khute latest news)

गुंतवणुकीचे पैसे स्वत:च्या खात्यात न घेता विविध बँकांमधील बनावट खात्यांवर गुंतवणूक स्वीकारण्यात आली. गुंतवणूकदारांना कमिशन देण्याचे आमिष दाखविण्यात आले. अधिक कमिशन हवे असल्यास अन्य नवीन गुंतवणूकदारांना पैसे भरण्यास प्रवृत्त करण्यास भाग पाडण्यात आले. टार्गेट पूर्ण केल्यास महागडी घरे, महागड्या गाड्या, बोनस, हॉलिडे मेंबरशीप आदींचे आमिष दाखविले. त्याद्वारे कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक स्वीकारण्यात आली. त्याच रकमेचा अपहार करण्यात आला. (Vinod Khute latest news)

‘ईडी’ने जून महिन्यात पुणे आणि अहमदनगरमधील ‘व्हीआयपीएस ग्रुप’ आणि ‘ग्लोबल एफिलिएट बिझनेस’च्या केंद्रांवर छापे टाकले होते. ‘ईडी’ने केलेल्या कारवाईत परकीय चलन व्यवस्थापन कायदा (फेमा) अंतर्गत १८ कोटी ५८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. (Vinod Khute latest news)

‘फॉरेक्स ट्रेडिंग’च्या नावाखालील रक्कम हवालाद्वारे भारताबाहेर

विनोद खुटे याने अन्य आरोपींच्या मदतीने ‘फॉरेस्ट ट्रेडिंग’च्या नावाखाली ‘काना कॅपिटल’ नावाने नवीन कंपनी तयार केली. या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करण्यात आले. गुंतवणूकदारांशी ‘झूम’ तसेच ‘ऑनलाईन’ पद्धतीने संपर्क साधला. त्यांना सातत्याने परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले. गुंतवणुकीचे पैसे उकळण्यासाठी बनावट फर्म तयार करण्यात आल्या. (Vinod Khute latest news)

पाच बनावट बँक खात्यांमध्ये गुंतवणूकदारांकडून पैसे भरून घेण्यात आले. त्यानंतर लोकांना ‘फॉरेस्ट ट्रेडिंग’ करायला लावली. फॉरेक्स, क्रिप्टो आणि स्टॉक ट्रेडिंगसाठी ब्रोकरेज देखील दिले जात होते. काही दिवसांनी अचानक ‘काना कॅपिटल’ या कंपनीचे कामकाज बंद करण्यात आले. विविध कंपन्या आणि बनावट खात्यांच्या माध्यमातून जमा झालेली 125 कोटी रुपयांपेक्षा अधिकची रक्कम हवाला रॅकेटच्या माध्यमातून भारताबाहेर पळविण्यात आली होती. (Vinod Khute latest news)

‘दुबई’मध्ये बसून चालवले रॅकेट

घोटाळ्याचा ‘मास्टरमाइंड’ असलेल्या विनोद खूटे याने हे रॅकेट दुबईमध्ये बसून चालवले. मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे ‘ग्लोबल एफिलिएट बिझनेस’च्या नावाखाली हा गोरखधंदा चालवला होता. मोबाईलमध्ये ‘गुगल प्ले स्टोअर’च्या माध्यमातून अॅप्लिकेशन डाऊनलोड करायला लावत पुढील सर्व व्यवहार केले जात होते. विविध बेकायदेशीर व्यवहार, क्रिप्टो एक्स्चेंज आणि वॉलेट सर्व्हिसद्वारे हजारो गुंतवणूकदारांना गंडवण्यात आले. (Vinod Khute latest news)

या फसवणुकीच्या गोरखधंद्यात प्रामुख्याने ग्लोबल एफिलिएट बिझनेस ऑपरेशन. गुगल प्ले स्टोअर आणि अप्पल स्टोअरवर उपलब्ध असलेल्या ‘ग्लोबल एफिलिएट बिझनेस’ नावाच्या ऍप्लिकेशनद्वारे आर्थिक व्यवहार करण्यात आले. ग्लोबल एफिलिएट बिझनेसद्वारे अनधिकृतरित्या मल्टी-लेव्हल मार्केटिंग (एमएलएम) स्कीम चालविल्या जात होत्या. विनोद खुटे याने पुण्यामध्ये मेसर्स डी धनश्री मल्टी-स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड सुरू केली होती. याद्वारे देखील गुंतवणूकदारांना फसव्या योजनांसह भुरळ पाडली होती. (Vinod Khute latest news)

दरम्यान, विनोद खुटे याने आपल्या नातेवाईकांच्या मदतीने गुंतवणूकदारांकडून कोट्यावधीची गुंतवणूक जमा केली आहे. खुटे आणि इतर आरोपींनी लोकांना उच्च परतावा देण्याचे आमिष दाखवून पॉन्झी स्कीम आणि फॉरेक्स ट्रेडिंगचे आमिष दाखविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांनी बोगस कंपन्या आणि संस्थांच्या बँक खात्यांमध्ये 125 कोटींहून अधिक रक्कम जमा केल्याचा आरोप आहे. खुटे याने भारतीय गुंतवणूकदारांकडून 400 कोटी रुपयांहून अधिक बेहिशेबी पैसे गोळा केले असा तपास यंत्रणांना संशय त्यादृष्टीने तपास यंत्रणा कसून तपास करत आहेत. (Vinod Khute latest news)