… मग मोदींनी नारायण राणेंचा राजीनामा का घेतला नाही ? कदाचित मोदी याचा पुण्यात खुलासा करतील, शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाई नंतर नवाब मलिकांच्या अटकेनंतर भाजप झाली आहे.  मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपने अधिवेशनात जोरदार मागणी केली. स्वाक्षरी मोहिम राबवली. आता 9 मार्च ला मोर्चा काढण्याचा घोषणा भाजपने केली आहे. मलिकांच्या राजीनाम्याची आक्रमक झालेल्या भाजपची हवा काढून घेण्यासाठी शरद पवार मैदानात उतरले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्यापार्श्वभूमीवर शरद पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. नवाब मलिक प्रकरणावरून भाजपकडून जे राजकारण केले जात आहे त्याचा समाचार घेताना पवार म्हणाले की, नवाब मलिक यांच्यावर चुकीच्या पद्धतीने व राजकीय हेतूने कारवाई केली गेली आहे.

त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना यातना देण्याचा प्रयत्न जाणूनबुजून केला जात आहे. गेली २० वर्षे महाराष्ट्राच्या विधानसभेत नवाब मलिक आहेत. या काळात नवाब मलिक यांच्यावर आरोप झाले नाहीत असे ट्विट पवार यांनी केले आहे.

पवार पुढे म्हणाले की, एखादा मुस्लिम कार्यकर्ता दिसला की त्याला दाऊदचा जोडीदार बोलायचं. कारण नसताना हे आरोप केले जात आहेत. कधीकाळी माझ्यावरही असेच आरोप झाले होते. हे लोक या पद्धतीने वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतात. त्याची चिंता करण्याचे कारण नाही.

नवाब मलिक यांना अटक झाली म्हणून मंत्रिमंडळातून काढा, अशी मागणी केली जात आहे. मलिक यांना अटक झाली हे खरं. परंतु सिंधुदुर्गातील आमचे जुने सहकारी नारायण राणे यांनाही अटक झाली होती. त्यांना अटक झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळातून कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे पाहण्यात आले नाही.

उद्या पंतप्रधान पुण्यात येत आहेत. कदाचित याचा खुलासा ते करतील. एक न्याय नारायण राणे यांना लावता आणि दुसरा न्याय नवाब मलिक यांना लावता याचा अर्थ हे सगळं राजकीय हेतूने केले जात आहे असा जोरदार हल्लाबोल शरद पवार यांनी भाजपवर केला आहे.

नवाब मलिक प्रकरणावरून आक्रमक झालेल्या भाजपला शरद पवारांनी थेट उत्तर देत या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केल्याने रविवारी मोदी पुण्यात या संपुर्ण प्रकरणावर काय भाष्य करतात याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.