ठाकरे हारले… शिंदे जिंकले.. सरकारने विश्वास दर्शक ठराव जिंकला

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्यातील ठाकरे सरकार कोसळून राज्यात सत्तेवर आलेल्या भाजप प्रणित शिंदे सरकारने विश्वास दर्शक ठराव जिंकला आणि विधानसभेत बहुमत सिध्द केले. शिंदे – फडणवीस सरकारच्या बाजूने 164 सदस्यांनी मतदान केले. विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या घडामोडीत ठाकरे हारले आणि शिंदे जिंकले.

शिवसेनेत बंडखोरी झाल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे – फडणवीस सरकार सत्तेवर आले. बहुमत सिद्ध करण्यासाठी बोलावलेल्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजपचे राहूल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकले. त्यांना 164 मते पडली होती तर महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना 107 मते पडली होती.

आज अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी शिंदे सरकार विश्वास दर्शक ठरावाला सामोरे गेले. सरकारच्या बाजूने 164 सदस्यांनी मतदान केले. तर महाविकास आघाडीच्या बाजूने 99 सदस्यांनी मतदान केले. एमआयएम, समाजवादी पार्टी यांनी तटस्थ भूमिका घेतली. शिवसेनेला आज मोठा धक्का बसला, शिवसेनेचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला.

विधानसभेतल्या काँग्रेस नेत्यांना बहुमत चाचणीचं इतकं गांभिर्य होतं, की ते विधान सभेच्या दरवाजाबाहेरच राहिले. अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, धीरज देशमुख, प्रणिती शिंदे आदी सात आमदार ‘उशीर’ झाल्यामुळं मतदान प्रक्रियेत भाग घेऊ शकलेले नाहीत.

एकूण मतं – 286

(निधन – रमेश लटके, शिवसेना)

(पीठासीन अधिकारी – मतदानाचा अधिकार नाही – राहुल नार्वेकर, भाजप)

ठरावाच्या बाजूने – 164

ठरावाच्या विरोधात – 99

विश्वासदर्शक ठरावाला कोण-कोण नव्हते

 1. अशोक चव्हाण, काँग्रेस.
 2. विजय वडेट्टीवार, काँग्रेस
 3. प्रणिती शिंदे, काँग्रेस
 4. झिशान सिद्दिकी, काँग्रेस
 5. धीरज देशमुख, काँग्रेस
 6. अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी
 7. संग्राम जगताप,राष्ट्रवादी,अहमदनगर शहर
 8. जितेश अंतापुरकर, काँग्रेस
 9. कुणाल पाटील, काँग्रेस
 10. मुक्ता टिळक, भाजप (आजारी)
 11. लक्ष्मण जगताप, भाजप (आजारी)
 12. नवाब मलिक, राष्ट्रवादी (जेलमध्ये)
 13. अनिल देशमुख, राष्ट्रवादी (जेलमध्ये)
 14. मुफ्ती इस्माईल, एमआयएम
 15. दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी
 16. दिलीप मोहिते, राष्ट्रवादी
 17. राजू आवळे, काँग्रेस
 18. मोहन हंबर्डे, काँग्रेस
 19. शिरीष चौधरी, काँग्रेस

तटस्थ

 1. रईस शेख, सपा
 2. अबू आझमी, सपा
 3. शाह फकुर अन्वर, एमआयएम

विधानसभा अधिवेशनात काय घडतयं पहा LIVE ⤵️