आम्ही बंड केले नसून उठाव केला आहे असे म्हणत गुलाबराव पाटलांनी धु धु धुतले

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । Gulabrao Patil vidhansabha speech today’s | तुम्ही आम्हाला म्हणायला पाहिजे होतं, या चिमण्यांनो परत या, मातोश्रीवर या, चार कंडोळ्यांनी आमच्या उद्धव ठाकरेंना बावळट केलं, त्यांची लायकी नाही, निवडून येण्याची, आमच्या मतावर ते खासदार होत आहे, महिलांना वेश्या म्हणता, हे कोण सहन करणार आहे, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत जोरदार फटकेबाजी केली.

एकनाथ शिंदे सरकारने बहुमत जिंकल्यानंतर अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात आला. यावर शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

एकनाथ शिंदे सुरतला गेले होते, ते गेल्यानंतर आम्ही 20 आमदार होतो, साहेबांकडे गेलो होतो. ‘असं असं शिंदे साहेब म्हणत आहे. त्यांचं ऐकून तरी घ्या’, त्यावेळी तुम्हाला जायचं जायचं तर जा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पण असं होत नाही, असा खुलासाच शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांनी केला.

35-35 वर्ष आम्ही शिवसेनेत घातली आहे. बाळासाहेब हे आमच्या ह्रदयात राहतील. आम्ही योग्यच केलं आहे, भाजप-शिवसेनेची युती राहणार होती, तेच आम्ही केलं आहे, असंही गुलाबराव पाटलांनी ठणकावून सांगितलं.

पाच आमदार गेले ठीक आहे. 40 आमदार सोडून जात आहे. अरे 25-25 वर्ष आमदार राहिलेले लोक सोडून जात आहे. मंत्रिपद सोडून जात आहे तरी आमची किंमत नाही. तुम्ही आम्हाला म्हणायला पाहिजे होतं, या चिमण्यानो परत या, मातोश्रीवर या. या चार कंडोळ्यांनी आमच्या उद्धव ठाकरेंना बावळट केलं, त्यांची लायकी नाही, निवडून येण्याची, आमच्या मतावर ते खासदार होत आहे, महिलांना वेश्या म्हणता, हे कोण सहन करणार आहे, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली.

आम्हाला जे मिळालं ते बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने मिळालं आहे. आम्ही बंड केलं नाही तर उठाव केला आहे.आम्ही हिंदुत्त्वाशी तडजोड केली नाही. मला टपरीवर पाठवण्याची धमकी दिली जात आहे. आमचे मुख्यमंत्री हे रिक्षा चालक होते. ज्यांना कुणाला काही करत येत नव्हतं, अशा माझ्या सारखा असंख्य नेते आमदार झाले, ते बाळासाहेब आणि दिघे साहेबांच्या आशिर्वादांमुळे झाले आहे, असं पाटील म्हणाले.

‘अजितदादा म्हणाले, शिवसेना फोडल्यानंतर आमदार निवडून येत नाही. पण आम्ही शिवसेना सोडली नाही. आम्ही सेनेतच आहोत. 55 आमदारांमधून 40 आमदार कसे काय फुटतात, एक जिल्हाप्रमुख फुटणार असं कळलं होतं, त्यावेळी रात्रभर घेऊन त्याला बसलो होतो, त्यावेळी त्याला नको सोडून अशी समजूत काढली होती इथं तर 40 आमदार फुटले, मंत्री फुटले, मग आमची काही किंमत नाही का?’ असंही गुलाबराव पाटील म्हणाले.

सगळे आमदार हे दु:ख सांगण्यासाठी मातोश्रीवर गेलो होतो. साहेब आमची कामं होत नाही, असं सांगत होतो. पण चहापेक्षा केटली गरम होती. या ठिकाणी हा काही लोक बोलले, बंडखोरांनी नजर फिरवण्याची हिंमत नव्हती असे म्हणाले.पण आम्ही जेलमध्ये गेलो आहे. 302 च्या गुन्ह्यात शिक्षा भोगली आहे, तडीपारी होती आमच्यावर, असं असताना शिवसेनेचा भगवा ध्वज हातात घेतला होता, असं म्हणत गुलाबराव पाटलांनी आदित्य ठाकरे यांना उत्तर दिलं.

‘तुमची प्रेत बाहेर येईल, तुम्ही डुक्कर आहात, वरळीमधून जाऊ देणार नाही, अशी धमकी देत आहे, पण आम्ही काही लेचेपेचे आमदार नाही. असंच आमदार म्हणून निवडून आलो नाही, असा पलटवारही गुलाबराव पाटलांनी केला.

विधानसभा अधिवेशन LIVE ⤵️