तलाठी भरती 2023 : खुशखबर ! महाराष्ट्रात होणार 4625 जागांवर तलाठी भरती, 17 ऑगस्ट 2023 ते 12 सप्टेंबर 2023 या कालावधीत होणार ऑनलाईन परिक्षा !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । तलाठी भरती 2023 ।  महसुल विभागात रिक्त असलेल्या तलाठी (talathi) पदांची भरती कधी होणार याकडे लक्ष लागून असलेल्यांसाठी सरकारने आनंदाची बातमी (Good News) दिली आहे. राज्यात सत्तेवर असलेल्या शिंदे – फडणवीस सरकारने रिक्त असलेल्या तलाठी पदांची मेगा भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेली तलाठी भरती 2023 (talathi bharati 2023) महाराष्ट्र सरकारने जाहीर केली आहे. राज्यात 4625 जागांची मेगाभरती होणार आहे. तलाठी भरतीची प्रारूप जाहिरात सरकारने प्रसिध्द केली आहे.सरकारने तलाठी भरती संदर्भात जारी केलेल्या जाहिरातीनुसार 17 ऑगस्ट 2023 ते 12 सप्टेंबर 2023 या कालावधीत ही मेगाभरती होणार आहे. सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या तरूणांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

talathi recruitment 2023, good news,Talathi bharti will be held in 4625 seats in Maharashtra, talathi bharti online examination will be held from 17th August 2023 to 12th September 2023, Shinde-Fadnavis government's big decision,

महसुल व वन विभागाने तलाठी भरती 2023 चा आदेश जारी केला आहे.महसुल विभागाच्या गट क संवर्गातील 4625 तलाठी पदांची सरळसेवा भरती होणार आहे. ही भरती जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख, पुणे कार्यालयाकडून 17 ऑगस्ट 2023 ते 12 सप्टेंबर 2023 या कालावधीत महाराष्ट्रातील 36 जिल्हा केंद्रावर ऑनलाईन पध्दतीने परिक्षा घेतली जाणार आहे. परिक्षेची अंतिम तारीख नंतर जाहीर केली जाणार आहे.

तलाठी भरती 2023 ची सर्व माहिती https://mahabhumi.gov.in/mahabhumilink या लिंकवर उपलब्ध आहे. तसेच सदर तलाठी भरतीच्या जाहिरातीची माहिती सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी यांच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच सदर तलाठी भरतीची पटसंख्या आणि आरक्षण यात संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल (कमी जास्त) होण्याची शक्यता आहे. सदरचा बदल झाल्यास याबाबतची घोषणा वेबसाईटवर दिली जाणार आहे. वेबसाईटवर जारी करण्यात आलेल्या सूचनांनुसार भरती प्रक्रिया पार पडणार असल्याचे या आदेशात म्हटले आहे.

तलाठी भरती 2023 ही राज्यस्तरावरून राबवली जाणार आहे. परंतू तलाठी संवर्गाची यादी तयार करताना त्या त्या जिल्ह्यात भरावयाच्या पदांचा विचार करून  प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्र निवड यादी तयार करण्यात येऊन, त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्र निवड यादी जाहीर केली जाईल. उमेदवारास मिळालेले गुण त्याने अर्ज केलेल्या जिल्ह्याकरताच विचारार्थ घेतले जातील. त्याचा अन्य जिल्ह्यातील निवड यादीशी कोणताही संबंध असणार नाही. तलाठी संवर्गासाठी नियुक्ती प्राधिकारी हे संबंधित उपविभागाचे उपविभागीय अधिकारी असतील, परंतु निवड झालेल्या उमेदवारास उपविभाग नेमून देण्याचे सर्व अधिकार हे संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना असतील.

राज्याच्या ग्रामीण भागात तलाठी या पदाला खूप मोठे महत्व आहे. शेतकऱ्यांची सगळी कामे तलाठ्यावर अवलंबून असतात. राज्यात मोठ्या प्रमाणावर तलाठ्यांची पदे रिक्त असल्याने ऐका ऐका तलाठ्याकडे दोन दोन तीन तीन गावांचा कारभार असतो. यामुळे तलाठ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत होता. शिवाय गावासाठी पूर्णवेळ तलाठी नसल्याने शेतकऱ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत असायचा, यामुळे राज्यातील तलाठ्यांची रिक्त पदे तातडीने भरावीत अशी मागणी सरकारकडे सातत्याने व्हायची, अखेर सरकारने या मागणीचा विचार करून तलाठी भरती जाहीर केली आहे.

गतिमान प्रशासनासाठी सरकारने तलाठी भरतीचा घेतलेला निर्णय सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरूणाईला मोठी संधी असणार आहे. तलाठी भरती जाहीर झाल्याने सरकारी नोकरीसाठी धडपड करणाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.