तलाठी भरती 2023 : अखेर 4644 तलाठी पदांच्या सरळसेवा भरतीची जाहिरात प्रसिद्ध, जाणून घ्या भरतीचे ताजे अपडेट !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्र सरकारच्या महसुल विभागाकडून तलाठी (गट क) पदभरतीची जाहिरात (Talathi Bharati 2023) प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात 4644 पदांच्या सरळसेवा भरतीकरिता जमाबंदी आयुक्त तथा संचालक, भूमि अभिलेख महाराष्ट्र राज्य, पुणे कार्यालयाकडून राज्यातील 36 जिल्ह्यातील परिक्षा केंद्रांवर ऑनलाईन पध्दतीने परिक्षा घेण्यात येणार आहे. (Talathi Bharati Latest update)
तलाठी भरती 2023 मध्ये एकुण 4644 पदांची भरती होणार आहे. या भरतीसाठी येत्या 26 जून 2023 पासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.अर्ज करण्याची अंतिम मुदत 17 जुलै 2023 रोजी 23: 55 वाजेपर्यंत आहे.
पदाचे नाव – तलाठी (गट क)
एकुण जागा – 4644
वेतनश्रेणी – S-8 : 25500 – 81100 ( अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
तलाठी भरती 2023 जाहिरात PDF डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा
तलाठी भरती शैक्षणिक पात्रता
जाहिरातीमध्ये नमुद पदांसाठी अर्ज करणेकामी जाहिरात प्रसिध्दी दि. २६/०६/२०२३ रोजी उमेदवाराने पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पुर्णतः धारण करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मुंबई यांचेकडील दि. १ जुलै २०१० च्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.
शासन निर्णय, माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) क्र. मातंस – २०१२/प्र.क्र२७७/३९, दि. ४ / २ /२०१३ मध्ये नमूद केल्यानुसार संगणक/ माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. नसल्यास, शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रशिक्षण- २०००/प्र.क्र६१/२००१/३९, दि. १९/३/२००३ नुसार संगणकाची अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून २ (दोन) वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील.
मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी / हिंदी विषयाचा समावेश नसल्यास, निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची मराठी / हिंदी भाषा परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
तलाठी पदाच्या निवडीसाठी कार्यपध्दती, आवश्यक कागदपत्रे तसेच महत्वाच्या अटी व शर्ती (सर्व उमेदवारांसाठी )
तलाठी पदासाठी अर्ज केलेला उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा व त्याचेकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
तलाठी पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी शासन निर्णय क्र. रिपभ/प्र.क्र /६६/२०११/ई-१० दि. १७ जून २०११ नुसार ज्या परिक्षार्थीकडे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificat) उपलब्ध नसल्यास त्यांनी त्यांचा जन्म महाराष्ट्र राज्यात झाला असल्याचा जन्म दाखला (Birth Certificate) सादर करणे आवश्यक आहे. अशा प्रकरणात अधिवास प्रमाणपत्राची अट लागू राहणार नाही. सदर परिक्षार्थीकडे अधिवास प्रमाणपत्र तसेच जन्म तारखेचा दाखला उपलब्ध नसल्यास, त्या परिक्षार्थीने आपला शाळा सोडल्याचा दाखला सादर करणे आवश्यक राहील. परंतू सदर शाळा सोडल्याच्या दाखल्यामध्ये त्या परिक्षार्थीचा जन्म हा महाराष्ट्र राज्यात झाल्याची नोंद असणे आवश्यक आहे. अशा प्रकरणात अधिवास प्रमाणपत्राची अट लागू राहणार नाही. ज्या उमेदवाराचा जन्म महाराष्ट्र राज्यात झाला नसेल परंतू महाराष्ट्र राज्यातील रहिवास सलग १५ वर्ष व त्यापेक्षा अधिक कालावधीचा आहे अशा परीक्षार्थी / उमेदवारांसाठी अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificat) आवश्यक राहील.
उमेदवाराने अर्ज केला अथवा विहित अर्हता धारण केली म्हणजे परीक्षेला बोलाविण्याचा अथवा नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे नाही.
आरक्षित मागास प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना ज्या संदर्भातील सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र ( Caste Certificate) व उपलब्ध असल्यास जात वैधता प्रमाणपत्र (Validity Certificate) निवडी अंती सादर करणे आवश्यक आहे..
जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास, शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. बीसीसी-२०११/प्र.क्र.१०६४/२०११/१६-ब, दि. १२/१२/२०११ मधील तरतुदीनुसार, याचिका क्र. २१३६ / २०११ व अन्य याचिकांवर मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दि. २५/८/२०११ रोजी दिलेल्या आदेशाच्या विरोधात मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे दाखल केलेल्या एसएलपी मधील आदेशाच्या अधीन राहून तात्पुरते नियुक्त आदेश निर्गमित केल्याच्या दिनांकापासून ०६ महिन्याचे आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. अन्यथा त्यांची नियुक्ती पुर्वलक्षी प्रभावाने रद्द करण्यात येईल.
उमेदवारांना परीक्षेसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल. परिक्षेसाठी नेमून दिलेल्या परिक्षा केंद्रावर दिलेल्या वेळेपूर्वी १ तास अगोदर उपस्थित रहावे. ६.७ नियुक्ती होणाऱ्या उमेदवारास शासन निर्णय दि. २१/१०/२००५ नुसार लागु करण्यात आलेली नवीन परिभाषिक अंशदायी निवृत्तीवेतन योजना (New Defined Contributory Pension Scheme) लागू राहील. त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेनाचे अंशराशीकरण) नियम १९८४ आणि सर्वसाधारण भविष्य निर्वाहनिधी योजना लागू राहणार नाही. तथापि, सदर नियमात भविष्यात काही बदल झाल्यास त्याप्रमाणे योजना लागू राहील.
सदर भरती प्रक्रिया राज्यस्तरावरुन एकत्रितरित्या राबविली जात असली तरी सदर तलाठी संवर्गाची यादी तयार करताना त्या- त्या जिल्हयात भरावयाच्या पदांचा विचार करून, प्रत्येक जिल्हयाची स्वतंत्र निवड यादी तयार करण्यात येऊन त्यानुसार प्रत्येक जिल्हयाची स्वतंत्र निवड यादी जाहीर केली जाईल. उमेदवारास मिळालेले गुण त्याने अर्ज केलेल्या जिल्हयाकरीताच विचारार्थ घेतले जातील व त्याचा अन्य जिल्हयातील निवड यादीशी कोणताही संबंध असणार नाही.
उमेदवारांना ज्या जिल्हयाच्या निवडसूची मध्ये निवड जाहीर केली आहे अशा पात्र उमेदवारांना संबंधित जिल्हा हेच नियुक्तीसाठी कार्यक्षेत्र असणार आहे. निवडसूचीतील उमेदवार आवश्यक ती पात्रता पूर्ण करतील त्यांना कागदपत्रे पडताळणीअंती वैद्यकीय व चारित्र पडताळणी पूर्ण करुन नियुक्तीपत्र देण्यात येतील. नियुक्ती बाबतचे सर्व अधिकार हे संबंधित जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांना असतील.
अंतिम निवड यादीतील पात्र उमेदवारांनी सादर केलेल्या विविध प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती मुळ प्रमाणपत्राचे आधारे कागदपत्रे तपासणीवेळी तपासण्यात येतील. सदर प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती मुळ प्रमाणपत्राच्या आधारे कागदपत्र तपासण्याच्या वेळी उपलब्ध करुन देणे उमेदवारांना बंधनकारक राहील. त्यामधील प्रमाणपत्रे खोटी किंवा चुकीची आढळल्यास संबंधित उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.