शेत तेथे पौष्टिक तृणधान्य मोहिम : अहमदनगर जिल्ह्यात ६९ हजार तृणधान्य बियाण्यांच्या मिनीकिटचे होणार मोफत वाटप, पहा तालुकानिहाय तृणधान्य मिनीकिटची यादी !
अहमदनगर, दि 23 जून 2023 : International Year of MILLETS 2023 : महाराष्ट्र कृषी विभागाच्या वतीने ‘शेत तेथे पौष्टिक तृणधान्य’ मोहीमेतर्गंत जिल्ह्यात तृणधान्य बियाणांचे ६९०६६ मिनिकिटचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तृणधान्याची शेतात लागवड करावी. बियाणे मिनिकिट मोफत प्राप्त करून घेण्यासाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे. (Agriculture Latest News)
संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ – २४ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (INTERNATIONAL YEAR OF MILLETS 2023) म्हणून घोषीत केले आहे. पौष्टिक तृणधान्य उत्पादन वाढ करण्याच्या हेतूने पौष्टिक तृणधान्य मिनिकिट वाटप व मिलेट क्रॉप कॅफेटिरीया बाबींची अंमलबजावणी २०२३- २४ वर्षामध्ये करण्यात येणार आहे. (Ahmednagar Latest News)
पौष्टिक तृणधान्याचे आहारामधील महत्वाबाबत जागृती व्हावी व लोकांना कमी किंमतीत मुबलक प्रमाणात तृणधान्य उपलब्ध व्हावेत.यासाठी ‘शेत तेथे पौष्टिक तृणधान्य’ मोहिमेंअंतर्गत जिल्हयात ६५५६० मिनिकिटचे व मिलेट क्रॉप कॅफेटिरीया अंतर्गत ३५०६ मिनिकिटचे मोफत वाटप केले जाणार आहे. (Maharashtra Agriculture Department News)
अहमदनगर जिल्ह्यात मिलेट क्रॉप कॅफेटिरीया अंतर्गत ज्वारी १०० ग्रॅम, बाजरी ५० ग्रॅम, नाचणी ५० ग्रॅम व राळा १०० ग्रॅम, कोदो ५० ग्रॅम, राजगिरा २५ ग्रॅम असे एकूण ३७५ ग्रॅम वजनाचे ५ आर क्षेत्रासाठी ३५०६ मिनिकिट मोफत वाटप होणार आहेत.
तसेच ‘शेत तेथे पौष्टिक तृणधान्य’ मोहिमेंतर्गत ६५५६० पिकनिहाय असे एकूण तालुकानिहाय ६९०६६ मिनिकिटचे अहमदनगर – २९१०, पारनेर- ४१४५, पाथर्डी – ३५१०, कर्जत- ४३४०, जामखेड – ३५४१, श्रीगोंदा – ४०६०, श्रीरामपुर – ३५२०, राहुरी- ३७४०, नेवासा – ३६३०, शेवगाव – ३८७०, संगमनेर- ५१५०,अकोले- २००५०, कोपरगाव – ३२४०, राहाता- ३३५० असे एकूण ६९०९९ तृणधान्य पिकाचे मिनिकिट शेतकऱ्यांना मोफत वाटप करण्यात येणार आहेत. (Maharashtra Agriculture Department Latest News)
या अभियानातून उत्पादित होणारे तृणधान्य शेतकऱ्यांच्या कुटुंबाला वापरता येणार आहे तसेच बियाणे म्हणूनही पुढील वर्षी वापर करता येणार आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयरोग, मधुमेह व पोटाच्या विकाराचे प्रमाणे खुप वाढले आहे. त्यामुळे आहारात ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर, राजगिरा, राळा अशा तृणधान्यापासून बनलेल्या पदार्थाचे महत्त्व सुद्धा वाढू लागले आहे.
त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या तृणधान्य पिकाच्या बियाणे मिनिकिटची लागवड करावी. बियाणे मिनिकिट मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या भागातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांनी केले आहे.