धक्कादायक : मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या, 23 व्या मजल्यावरून उडी मारत संपवली जीवनयात्रा !

मुंबई: दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक पारस पोरवाल (वय-57) यांनी राहत्या इमारतीच्या 23 व्या मजल्यावरुन उडी (Jumping from the Building) घेत आत्महत्या (Builder Paras Porwal Suicide) केल्याची धक्कादायक घटना आज (गुरुवार) घडली आहे.

व्यवसायात झालेल्या आर्थिक तोट्यातून पारस पोरवाल यांनी आत्महत्या (Builder Paras Porwal Suicide) केली. या घटनेची माहिती मिळताच काळाचौकी पोलीस ठाण्याचे (Kalachowki Police Station) पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भायखळा येथे गुरुवारी सकाळी ही आत्महत्येची घटना घडली आहे. पारस पोरवाल यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. यात पोलिसांना पोरवाल यांनी लिहिलेली एक सुसाइड नोट (Suicide Note) सापडली आहे. त्यानुसार पोरवाल यांनी व्यवसायात झालेल्या आर्थिक तोट्यातून जीवन संपविण्याचे हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे.

Shocking, Mumbai's famous builder Paras Porwal commits suicide, jumps from 23rd floor to end his life journey

पारस पोरवाल यांनी इमारतीच्या टेरेस वरुन उडी मारुन आत्महत्या केली. त्यांच्या जिमच्या खोलीत एक सुसाईड नोट सापडली असून त्यामध्ये आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, कोणाचीही चौकशी करु नये, असे लिहिलेले आहे. नातेवाईकांनी त्यांचे अक्षर ओळखले आहे. त्यांचाही कुणावर संशय नसल्याचे नातावेईकांनी पोलिसांना सांगितले.