Ram Shinde Birthday : साधेपणा जपत विधानपरिषद सभापती प्रा राम शिंदे यांनी साजरा केला वाढदिवस, कुटूंबासह देवदर्शन करत केला नव वर्षाचा प्रारंभ !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख । दरवर्षी कर्जत जामखेड (karjat jamkhed) मतदारसंघातील कार्यकर्ते व जनतेसोबत मोठ्या धुमधडाक्यात आपला वाढदिवस साजरा करणाऱ्या प्रा राम शिंदे (ram shinde bjp) यांनी यंदा प्रथमच आपला वाढदिवस अतिशय साधेपणाने साजरा केला.विधानपरिषद सभापती पदावर विराजमान झाल्यानंतर प्रा राम शिंदे (ram shinde mla) यांनी कुटूंबासह देवदर्शन करत यंदाचा वाढदिवस साजरा केला. त्यांनी नवीन वर्षाच्या (Happy New Year 2025) प्रारंभी भीमाशंकर देवस्थान, अखंड महाराष्ट्राचे अराध्य दैवत जेजुरीचा खंडोबा आणि पुण्यातील दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेत नव्या वर्षांचा प्रारंभ केला.

आमदार प्रा.राम शिंदे यांची नागपूर हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाली. विधिमंडळाच्या सर्वोच्च पदावर राम शिंदे यांची निवड झाल्याबद्दल शिंदे समर्थकांसह भाजप महायुतीने कर्जत-जामखेड मतदारसंघात २९ डिसेंबर रोजी भव्य दिव्य मिरवणूक काढत शिंदे यांचे जंगी स्वागत केले.

मतदारसंघात दाखल होण्यापुर्वी राम शिंदे यांनी आपल्या कुटूंबासह बाळूमामा देवस्थान आदमापुर, महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर, बिरोबा देवस्थान आरेवाडी आणि कन्हेरी मारूती मंदिर या तिर्थस्थळांना भेटी देत देवदर्शन केले होते. त्यानंतर मतदारसंघात त्यांचे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले होते.

विधान परिषद सभापती प्रा राम शिंदे यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत नवीन वर्षाची सुरूवात देवदर्शन करत केली  नववर्ष व वाढदिवसाच्या निमित्त साधून महाराष्ट्र विधान परिषदचे सभापती प्रा राम शिंदे साहेब यांनी बुधवारी १ जानेवारी २०२५ रोजी सकाळी भीमाशंकर देवस्थानला भेट दिली. यावेळी त्यांनी सपत्नीक महादेवाचे मनोभावे दर्शन घेतले. आरती करत शंभू महादेवाचा आशिर्वाद घेतला. त्यानंतर त्यांनी मंदिर परिसराची पाहणी केली. भाविक भक्तांशी संवाद साधला.

त्यानंतर प्रा राम शिंदे यांनी अखंड महाराष्ट्राचे श्रध्दास्थान आणि कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र जेजुरीच्या खंडेरायाचे सपत्नीक दर्शन घेतले. पिवळ्याधमक भंडाऱ्याची मुक्त उधळण करत “येळकोट येळकोट जय मल्हार जयघोष करत शिंदे यांनी खंडेरायाचा आशिर्वाद घेतला. यावेळी जेजुरी देवस्थानच्या वतीने सभापती प्रा राम शिंदे, जामखेड पंचायत समितीच्या माजी सभापती आशाताई राम शिंदे यांचा सत्कार केला. देवस्थानच्या वतीने जारी करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रा राम शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

जेजुरीच्या खंडोबाचे दर्शन घेतल्यानंतर प्रा राम शिंदे यांनी पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरास भेट दिली. यावेळी त्यांनी गणरायाचे मनोभावे दर्शन घेत आशिर्वाद घेतला. वाढदिवसानिमित्त प्रा राम शिंदे यांनी कुटूंबासह देवदर्शन करत नवीन वर्षाचा पहिला दिवस भक्तिमय वातावरणात अतिशय साधेपणाने साजरा केला.