Rabbi Pik Vima 2025 : एक रूपयांत पीक विमा योजनेतून जामखेड तालुक्यात २६ हजार ६४८ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Rabbi Pik Vima 2025 । नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांचे नुकसान टाळण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री पीक विमा योजना (Pradhan Mantri Crop Insurance Scheme) राबविण्यात येते. या पीक विम्याचा आर्थिक ताण शेतकऱ्यांवर येऊ नये याकरिता महाराष्ट्र सरकारकडून एक रूपयांत पीक विमा योजना राबविण्यात येते. रब्बी हंगामासाठी (rabbi hangam २०२४-२०२५) प्रधानमंत्री पीक विमा या योजेअंतर्गत जामखेड तालुक्यातील ५६ हजार ४०८ शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा उतरून क्षेत्र संरक्षित केले आहे. (1 rupayat pik vima yojana maharashtra)

एक रुपयात पीक विमा योजनेत लाभ घेण्यासाठी १५ डिसेंबर अखेर जामखेड तालुक्यातून तब्बल ५६ हजार ४०८ अर्ज आले त्यातून २६ हजार ६४८ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतपिकांचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई देण्यासाठी शासनाच्या वतीने पंतप्रधान पीकविमा योजना राबविण्यात येते. दरवर्षी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात विमा हप्त्याची रक्कम भरावी लागत होती. दरम्यान, राज्य शासनाने एक रुपयात खरीप पिके संरक्षित करण्याची योजना सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवरील विमा हप्त्यापोटीचा आर्थिक भार हलका झाला आहे.
एकनाथ शिंदे सरकारच्या काळात कृषी मंत्रालयाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना हाती घेतली होती. या योजनेची मागील वर्षापासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. एक रुपयात पीक विमा योजना लागू झाल्यापासून पीक विमा काढणाऱ्या अर्जदारांची संख्या वाढली आहे.
रब्बी २०२४-२५ हंगामातील ज्वारी पिकाचा विमा भरण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर होती. तर हरभरा, गहू आणि रब्बी कांदा पिकाचा विमा काढण्यासाठी १५ डिसेंबर ही अंतिम तारीख होती. शेवटच्या तारखेपर्यंत जामखेड तालुक्यातील ५६ हजार ४०८ शेतकऱ्यांनी पीक विम्याचे अर्ज विमा कंपनीकडे दाखल केले आहेत. त्यानुसार जामखेड तालुक्यातील २८ हजार ६४८ हेक्टर क्षेत्रावरील रब्बी हंगामातील पिकांचा विमा उतरविण्यात आला आहे. हे पीक आता संरक्षित झाले असून, त्यांना नुकसान झाल्यास भरपाई मिळणे अपेक्षित आहे.