Excise Department Raid In Maharashtra : नववर्षाच्या पुर्वसंध्येला गोवा बनावटीच्या मद्याच्या तस्करीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, 1 कोटी 20 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त !
Excise Department raid In Maharashtra : जगभरात नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष (Happy New Year 2025) सुरू आहे. दारूच्या नशेत झिंगाट होऊन नववर्षाच्या स्वागताची पार्टी (Thirty First Party) मोठ्या प्रमाणात साजरी होते. याच संधीचा फायदा उचलत मद्य तस्करांकडून (Goa-made liquor smuggling) बनावट दारूचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा केला जातो.या तस्करीला रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून धडक कारवाया हाती घेण्यात आल्या आहेत. पुणे (Pune) जिल्ह्यातील एका कारवाईत १ कोटी २० लाख रूपयांचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.(Excise Department Raid In Pune)

विटभट्टीसाठी लागणाऱ्या कोळशाच्या पावडरच्या आडून व फ्रुट पल्प पॅकींगच्या नावाखाली अवैध गोवा बनावटीच्या मद्याच्या तस्करीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने (excise department raid) वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या छापेमारीत १ कोटी २० लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईत ९ आरोपींना अटक करुन विदेशी मद्याच्या १६६८ बाटल्या व ५ वाहने जप्त केली आहेत.फक्त गोवा राज्यात विक्रीकरीता असलेल्या मद्यावर ही धडक कारवाई करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क सासवड विभागाने ही कारवाई केली आहे. (Excise Department Raid In pune )

नाताळ व नववर्षाच्या स्वागत समारंभाच्या पार्श्वभूमीवर अधिक प्रमाणात मद्य पार्ट्यांचे आयोजन केले जाते. या कालावधीमध्ये कर बुडवून आणलेले परराज्यातील मद्य, विदेशी मद्य आणि बनावट मद्य यावर नियंत्रण आणण्यासाठी कार्यरत असलेल्या राज्य उत्पादन शुल्क सासवड विभागाच्या पथकाने एका संशयित वाहनांची तपासणी केली असता त्या वाहनात गोवा बनावटीच्या मद्याचे ३ बॉक्स मिळाले. चालकाकडे सखोल चौकशी केली असता, त्याने सांगितल्या प्रमाणे नसरापूर येथील एका पत्र्याच्या शेडवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकला.
त्या ठिकाणी एक इसम अशोक लेलंड ट्रक या गाडीतून गोवा बनावट मद्याचे बॉक्स गाडीतून उतरून गोडाऊनमध्ये ठेवत होता. त्यास ताब्यात घेऊन सदर ट्रक व पत्र्याचा शेडची तपासणी केली असता ट्रकमध्ये विटभट्टी साठी लागणाऱ्या कोळशाची पावडर आणि गोवा बनावटी च विविध ब्रँडच्या विदेशी मद्याचे बॉक्स तसेच पत्रा शेड मध्ये थर्माकोलच्या बोक्समध्ये गोवा बनावटीचे मद्य मिळून आले. सदर मद्य थेर्मकॉल बॉक्समध्ये पॅकींग करून फ्रूट पल्पच्या नावाखाली गुजरात व इतरत्र पाठवण्यासाठी पॅकिंग केले जात असल्याचे आढळून आले.
या छाप्यात सुझुकी ग्रांड विटारा चार चाकी अशोक लेलंड सहा चाकी ट्रक, गोवा बनावटीचे विविध ब्रान्ड चा विदेशि मध्याच्या १७१० बाटल्या (११६ बॉक्स) व इतर असा एकूण रु ५१,९५,१७० चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणातील चौघा आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (ए) (ई), ८०, ८१, ८३,९०, १०३ व १०८ अन्वये सासवड विभागाने गुन्हा रजि नं. ३३८/२०२४ नुसार गुन्हा नोंद केला.
सदर कारवाईत निरीक्षक श्री.एस.एस. बरगे, दुय्यम निरीक्षक श्री.पी.एम. मोहिते, श्री.एस.सी. शिंदे, तसेच स.दु.नि.श्री संदिप मांडवेकर, जवान श्री. सुनील कुदळे, दत्तात्रय पिलावरे, अंकुश कांबळे, ऋतिक कोळपे, . बाळू आढाव, यांनी सहभाग घेतला. सदर गुन्हयाचा पुढील तपास श्री.पी. एम. मोहिते दुय्यम निरीक्षक राज्य् उत्पादन शुल्क् सासवड विभाग, बीट क्र.०२ पुणे हे करीत आहेत. असे निरीक्षक संभाजी बरगे यांनी सांगितले पुढील तपास चालू आहे.
तसेच दुसऱ्या एका कारवाईत निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र.३, पुणे या पथका मार्फत निगडी गावचे हद्दीत पवळे ब्रिज खाली भक्ती शक्ती चौक पुणे देह रोडवर ता. हवेली, जि. पुणे येथे गोवा राज्यात विक्री करीता असलेले विदेशी मद्य व बिअर असा एकुण रु. १.३४,२३०/- किंमतीचा मद्य साठा एका सहा चाकी निळ्या रंगाच्या लक्ष्मी क्वीन ट्रव्हल कंपनी असे नाव असलेल्या खाजगी प्रवासी वाहतुक बस क्र. एमएच १२ बीडी ९३४५ या बसमधुन वाहतुक करताना वाहनचालकास ताब्यात घेवून जप्त करण्यात आला आहे.
सदरचा मद्यसाठा हा खडकी आँध रोड खडकी स्टेशन जवळ या ठिकाणी वितरीत करणार असल्याने त्या ठिकाणी जाऊन मद्यासह एकूण ०५ आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे. त्यासोबत २ दुचाकी वाहने व एक सहा चाकी बस जप्त करण्यात आली आहे. यामध्ये विदेशी दारुच्या ७५० मि.ली. क्षमतेच्या १२६ सिलबंद बाटल्या, बडवायझर बिअर ५०० मि.ली क्षमतेच्या २४ सिलबंद वाटल्या. सदर गुन्हयामध्ये असा एकुण रु. ६८, ३७,७३०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपींविरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ), (ई), ८१, ८३, ९०, १०३, १०८ अन्वये गुन्हा क्रमांक. १६२/२०२४ नोंद करण्यात आला आहे.
दोन्ही कारवाईत एकुण 12032900/- (एक कोटी वीस लाख बतीस हजार नऊशे) एवढ्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात येऊन ९ आरोपीना अटक करण्यात आली आहे तसेच विदेशी मद्याच्या 1668 बाटल्या व ५ वाहने जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई पुणे विभागाचे विभागीय उप-आयुक्त सागर धोमकर, पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत उपअधीक्षक संतोष जगदाळे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे. (Liquor worth 1 crore 20 lakhs seized by maharashtra State Excise Department)