जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्याच्या गृह विभागाने शुक्रवारी प्रादेशिक परिवहन विभागाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील 9 उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांचे प्रादेशिक कार्यालयात रूपांतरण करण्यास गृहविभागाने मंजुरी दिली आहे. यामध्ये अहमदनगर उपप्रादेशिक कार्यालयाचा समावेश आहे.
गृहविभागाने राज्यातील 9 उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयाचे RTO मध्ये रूपांतरण केले आहे. यामध्ये अहमदनगर, पिंपरी चिंचवड, सोलापुर, वसई (पालघर) जळगाव, चंद्रपूर, अकोला, बोरिवली, सातारा यांचा समावेश आहे.
राज्य सरकारने 9 RTO कार्यालयांना मंजुरी दिल्यामुळे काही कार्यालयांच्या अंतर्गत काही बदल करण्यात आले आहे. पुणे RTO कार्यालयाच्या अंतर्गत असलेले सोलापुर आणि पिंपरी चिंचवड कार्यालयांचे RTO कार्यालयात रूपांतरण झाल्याने पुणे RTOत बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा समावेश करण्यात आला आहे. तर सोलापुर RTO त अकलूज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय इतरही कार्यालयांमध्ये बदल करण्यात आला आहे.