Excise Department Raid : जामखेड तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा, चार वाहनांसह ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त, सहा जणांविरोधात गुन्हे दाखल
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (Excise Department Raid ) पुणे विभागीय भरारी पथकाने, जामखेड (Jamkhed) तालुक्यातील अरणगाव हद्दीत धडक कारवाई केली. गोवा बनावटी अवैध विदेशी मद्य वाहनात भरत असताना छापा मारला. याच गुन्ह्याचा तपास करत असताना परंडा तालुक्यातील लोणारवाडी (Lonarwadi Paranda) हददीत पथकाने (Excise Department Pune) कारवाई केली. अरणगाव (Arangaon Jamkhed) व लोणारवाडी येथील कारवाईत चार वाहनांसह ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त करून सहा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींमध्ये जामखेड शहरातील दोघांचा समावेश आहे. (Excise Department Raid in maharashtra)
राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट दारू विक्री व वाहतुकीविरोधात धडक मोहिम हाती घेतली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकांकडून कारवाईचा धडाका हाती घेतला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणे विभागीय भरारी पथक जामखेड तालुक्यात गस्तीवर असताना या पथकाला जामखेड तालुक्यातील अरणगाव हद्दीत अवैध गोवा बनावटीचे विदेशी मद्याची वाहतुक करणारे वाहन येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली त्यानुसार या पथकाने अरणगाव येथील एच पी पेट्रोल पंपाजवळ सापळा लावला होता.
मिळालेल्या माहितीनुसार सदर ठिकाणी महिंद्रा कंपनीची स्कॉर्पीओ व मारुती सुझुकी कंपनीची स्विफट डिझायर हे वाहन त्या ठिकाणी आले. स्कॉर्पीओ वाहनामधील गोवा बनावटीचे मद्य स्विफट डिझायर वाहनामध्ये भरत असताना सदर ठिकाणी पथकाने छापा मारला.यावेळी भरारी पथकाने केलेल्या धडक कारवाईत गोवा बनावटीच्या ॲडीरियल व्हिस्कीच्या (Goan-made Adairal Whiskey) (७५० मिली क्षमतेच्या) ३२४ सिलबंद बाटल्या (२७ बॉक्स) व वरील दोन वाहनासह अं. रु. १६,७२,७२० /- किंमतीचा मुददेमाल जप्त केला. या प्रकरणात चार इसमांविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला.
गोवा बनावटीच्या ॲडीरियल व्हिस्कीच्या मद्याचा साठा व चार वाहने असा ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त
याच गुन्हयाच्या पुढील तपासामध्ये लोणारवाडी गावचे हददीत, भैरवनाथ मंदिराजवळ, ता. परांडा जि. धाराशिव या ठिकाणी छापा मारुन अशोक लेलॅण्ड कंपनीचा चारचाकी वाहन क्र. एमएच ४५/ टी २२४७ व मारुती सुझुकी कंपनीची स्विफट डिझायर क्र. एमएच ०३ / एफ २७०५ सह ॲडरीयल व्हिस्कीच्या ७५० मिली क्षमतेच्या २१६ सिलबंद बाटल्या १८ बॉक्स असा अंदाजे रु. १४,५०,४८०/- किंमतीचा मुददेमाल रिकव्हरी पंचनाम्याखाली जप्त करुन दोन इसमाविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला. सदर गुन्हयामध्ये आतापर्यंत रु. ३१,२३,२००/- किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला असून गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.
जामखेडमधील दोघांसह सहा जणांविरोधात गुन्हे दाखल
सदर प्रकरणी १) दिपक आत्माराम खेडकर वय ४६ रा. रसाळनगर पोस्ट कार्यालयाशेजारी ता. जामखेड जि. अहिल्यानगर २) भरत शहाजी राळेभात वय ३५ वर्षे रा. राळेभातवस्ती, ता. जामखेड जि. अहिल्यानगर ३) मनोज दत्तात्रय रायपल्ली वय ४९ वर्षे रा. अतिथी कॉलनी बोरावके कॉलेज पाठीमागे ता. श्रीरामपुर जि. अहिल्यानगर, ४) दत्तात्रय गंगाधर सोनवणे वय ३२ वर्षे रा. मुठेवडगाव तुळशीराम महाराज मंदिरासमोर ता. श्रीरामपुर जि. अहिल्यानगर, ५) शस्त्रगुण ऊर्फ शतृघ्न नवनाथ किर्दक वय ३७ वर्षे रा. लोणारवाडी पो. शेळगाव ता. परांडा जि. धाराशिव, ६) कैलास आण्णा जोगदंड वय ३४ वर्षे रा. लोणारवाडी पो. शेळगाव ता. परांडा जि. धाराशिव यांच्या विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ अ, ई, ८१,८३,९० व १०८ अन्वये निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, पुणे विभाग, पुणे यांचे कार्यालयाकडे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी सह आयुक्त (अं.व.द) प्रसाद सुर्वे व विभागीय उप आयुक्त सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक विराज माने व धीरज सस्ते तसेच जवान प्रताप कदम, सतिश पोंधे, रणजीत चव्हाण, शशीकांत भाट, अनिल थोरात, अमोल दळवी व राहुल तारळकर यांनी केली असून, सदर गुन्हयाचा पुढील तपास निरीक्षक नरेंद्र थोरात हे करीत आहेत.