उत्पादन शुल्क विभागाची धाड, १४ लाखांंचा बनावट मद्यसाठा जप्त, संगमनेर तालुक्यात कारवाई

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संगमनेर युनिटच्या पथकाने बनावट मद्य बनवणाऱ्या कारखान्यावर टाकलेल्या धाडीत तब्बल 14 लाख 28 हजारांचा मद्य साठा जप्त केला. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली. या प्रकरणातील दोघा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Excise department raid, fake liquor stock worth 14 lakh seized, action taken in Sangamner taluka)

Excise department raid, fake liquor stock worth 14 lakh seized, action taken in Sangamner taluka

संगमनेर तालुक्यातील रायतेवाडी येथे बेकायदेशीरपणे परराज्यातील विदेशी मद्याचा साठा तसेच बनावट मद्य निर्मिती होत असल्याच्या खबरीवरून उत्पादन शुल्क विभागाने छापेमारी केली. चैतन्य सुभाष मंडलिक याच्या राहत्या घरी टाकलेल्या धाडीत गोवा राज्य, दमण व दिव राज्य निर्मितीचा व बनावट विदेशी मद्याचा साठा मिळून आलेला आहे. तसेच हुंदाई व्हेन्यू कंपनीची पांढ-या रंगाची एक चारचाकी वाहन  क्र.एम.एच.१७ सी. एम. ४२६८, आरोपीकडून जप्त करण्यात आले तसेच तीन मोबाईल सुध्दा जप्त करण्यात आले आहेत.

या प्रकरणात 14 लाख 28 हजार 950 रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. बेकायदेशीरपणे परराज्यातील विदेशी मद्याचा साठा तसेच बनावट मद्य निर्मिती करीत असल्या प्रकरणी चैतन्य सुभाष मंडलिक व सुरेश मनोज कालडा, या दोन आरोपीस अटक करण्यांत आली आहे त्यांच्या विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बनावट मद्य तयार करण्याच्या प्रकरणात आणखीन काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने वेगाने तपास केला जात आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क, संगमनेर- १ चे दुय्यम निरीक्षक एम.डी. कोडे हे करीत आहेत.