जामखेड टाईम्स वृत्तसेवा : ऐरवी आपल्या धडाकेबाज कारवायांसाठी प्रसिध्द असलेले जामखेडचे पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड हे रविवारी एका कार्यक्रमात भावूक झाल्याचे पहायला मिळाले. खाकी वर्दीच्या आड असलेल्या हळव्या मनाच्या संवेदनशील अधिकाऱ्यांचे दर्शन जामखेडकरांना झाले.
पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या हस्ते रविवारी जामखेड तालुक्यातील हळगाव येथील जय श्रीराम शुगर्स या खाजगी साखर कारखान्याच्या 11व्या गळीत हंगामाचा बाॅयलर अग्नीप्रदीपन सोहळा पार पडले.
जामखेड तालुक्यातील हळगाव येथील जय श्रीराम शुगर या साखर कारखान्याच्या बाॅयलर अग्नीप्रदीपन सोहळ्याचे रविवारी कारखाना कार्यस्थळावर आयोजन करण्यात आले होते.
त्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला. वडिलांच्या आठवणी सांगताना पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड हे भावूक झाले होते.
छोटाश्या ऊसउत्पादक शेतकऱ्याच्या मुलाच्या हस्ते एका साखर कारखान्याचे बाॅयलर अग्नीप्रदीपन होतेय.आज खर्या अर्थाने मला माझ्या वडिलांची फार आठवण येत आहे हे वाक्य सांगताच पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड हे भावूक झाले होते. यावेळी कार्यक्रमात काही क्षण भावूक वातावरण निर्माण झाले होते खाकी वर्दी आड दडलेला हळव्या मनाच्या संवेदनशील अधिकाऱ्यांचे दर्शन आज सर्वांनाच झाले.
पुढे बोलताना गायकवाड म्हणाले मला आवर्जून कार्यक्रमाला बोलावलं हा माझा सन्मान नसुन माझ्या वडिलांचा आणि शेतकऱ्यांचा सन्मान आहे याची मला जाणिव आहे अशी भावनिक प्रतिक्रिया जामखेडचे पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी जामखेड तालुक्यातील हळगाव येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.