कार्यकर्त्यांच्या मांदियाळीने चोंडी फुलणार,आमदार राम शिंदे यांच्या निवासस्थानी शुक्रवारी दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । 27 ऑक्टोबर 2022। दीपावली निमित्त उद्या शुक्रवारी 28 ऑक्टोबर 2022 रोजी आमदार प्रा राम शिंदे यांच्या निवासस्थानी दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमासाठी मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे अवाहन आमदार राम शिंदे यांनी केले आहे.

Organized Diwali Faral program at the residence of MLA Ram Shinde on Friday

सन 2014 ते 2019 या काळात आमदार प्रा राम शिंदे हे फडणवीस सरकारच्या काळात मंत्री होते. तेव्हा मतदारसंघासह राज्यातील शिंदे समर्थकांची चोंडीत नेहमी वर्दळ असायची, त्यामुळे चोंडी नेहमी कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुललेली असायची. मध्यंतरी काही काळ याला ब्रेक लागला होता पण आता आमदार राम शिंदे यांची विधान परिषदेवर वर्णी लागल्यानंतर चोंडी पुन्हा कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलू लागली आहे.

येत्या शुक्रवारी दिवाळीनिमित्त आमदार राम शिंदे यांच्या निवासस्थानी दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमांतून चोंडी पुन्हा एकदा कार्यकर्त्यांच्या मांदियाळीने फुलून निघणार आहे.दिवाळी फराळाच्या मेजवानीबरोबरच चोंडीत राजकीय फटाके फुटणार का? याचीच उत्सुकता सर्वांना आहे. दिवाळी फराळ कार्यक्रमातून आमदार राम शिंदे हे आपल्या कार्यकर्त्यांना काय संदेश देणार हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.