Omicron latest update in Mumbai | आता मात्र कहर झाला : एक दोन नव्हे तर तब्बल ‘इतके’ नागरिक आफ्रिकेतून मुंबईत आले | आदित्य ठाकरेंनी दिली खळबळजनक माहिती

मुंबई : Omicron latest update in Mumbai | कोरोनाच्या ओमिक्रॉन या व्हेरिएंटने जगाच्या चिंता वाढवलेल्या असतानाच आता महाराष्ट्रात खळबळ उडवून देणारे एक माहिती समोर आली आहे.दक्षिण आफ्रिकेतून (Tourists From South Africa Came To Mumbai) गेल्या १९ दिवसांत एक दोन नव्हे तर एक हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आल्याची धक्कादायक माहिती राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दिली आहे.

कोरोनाचा नवा व्हेरिएंट (Corona New Variant) ओमिक्रॉनने (Omicron) दहशतीचं वातावरण निर्माण केलं आहे, अशातच दक्षिण आफ्रिकेतून (Tourists From South Africa Came To Mumbai) गेल्या १९ दिवसांत एक हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आल्याची धक्कादायक माहिती राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दिली आहे.

आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ओमिक्रॉन वेगाने पसरत आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या या नव्या विषाणूचा शोध लागल्यानंतर अनेक देशांनी त्यांच्यावर निर्बंध आणले आहेत. केंद्र सरकारसोबत राज्य सरकारने तेथून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध आणले असताना आदित्य ठाकरेंनी दिलेली माहिती चिंता वाढवणारी आहे.

आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून एक हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत. आतापर्यंत जे लोक आले आहेत त्यांची माहिती आपण मिळवली आहे. जे मुंबईत आहेत त्यांना पालिकेकडून फोन केले जात आहेत”. तसेच परदेशातून गेल्या १० दिवसांत आलेल्या सर्वांना संपर्क साधून विचारपूस केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.संस्थात्मक विलगीकरणाची व्यवस्था केली जात असल्याचंही ते म्हणाले आहेत.

कोरोनाचा नवा विषाणू ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासंदर्भात आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती नियमितरित्या मिळत राहावी, जेणेकरून त्यांच्यावर लक्ष ठेवता येईल व संसर्गाला वेळीच रोखण्यात यश मिळेल असं सांगितलं.

ओमिक्रॉन विषाणुचे ५० पेक्षा जास्त म्युटेशन आहेत. सध्याच्या आरटीपीसीआर चाचणीत या व्हेरियंटची लागण असल्यास एस जिन आढळणार नाही. सध्या तरी प्रतिबंधासाठी मास्क सर्वात जास्त आवश्यक आहे. केंद्र सरकारने १२ देशातल्या प्रवाशांची तेथून विमानात बसण्यापूर्वी ७२ तास अगोदर आरटीपीसीआर चाचणी आवश्यक केली असून येथे उतरल्यावर परत एकदा आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. तसंच सात दिवसांसाठी विलगीकरण आवश्यक केलं आहे.

परदेशातून येणारे प्रवासी थेट मुंबईत किंवा महाराष्ट्रातील इतर विमानतळांवर न उतरता देशात इतरत्र उतरून नंतर देशांतर्गत विमानसेवेने किंवा रस्ते आणि रेल्वे मार्गे आल्यास त्यांची तपासणी कशी करणार हा सध्याचा प्रश्न असून पंतप्रधानांना देखील यासंदर्भात अवगत करण्यात यावे यावर बैठकीत चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशभरातील आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत विमानसेवांनी प्रवाशांची माहिती नियमितपणे एकमेकांना दिल्यास रुग्ण प्रवासी तसेच त्यांच्या संपर्कातील प्रवासी शोधणे सोपे जाईल असं सांगितलं.