- Advertisement -

NCP’s mega recruitment opens in Jamkhed taluka | अखेर प्रशांत शिंदे राष्ट्रवादीत डेरेदाखल : राष्ट्रवादीच्या मेगाभरतीचे जामखेड तालुक्यात दणक्यात ओपनिंग

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : सत्तार शेख। NCP’s mega recruitment opens in Jamkhed taluka | आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, विविध कार्यकारी सेवा संस्थाच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत राष्ट्रवादीने (NCP) मंगळवारी इनकमिंग मोहिमेचा जामखेड तालुक्यात दणक्यात शुभारंभ केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जामखेड तालुक्यातील नान्नजमध्ये मंगळवारी सायंकाळी पक्ष प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर (State Women’s Commission Chairperson Rupalitai Chakankar) यांच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांनी भाजपची साथ सोडत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

चर्चेतल्या बातम्या

युवा नेते प्रशांत शिंदे (Prashnt Shinde Join NCP) यांचा राष्ट्रवादीत प्रवेश कधी होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. कारण अनेकदा प्रशांत शिंदे यांच्या पक्ष प्रवेशाचा मुहूर्त टळला होता. मात्र मंगळवारी पक्ष प्रवेशाचा योग जुळून आला आणि प्रशांत शिंदे व त्यांच्या समर्थकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत राष्ट्रवादीत प्रवेश केला. प्रशांत शिंदे व त्यांचे समर्थक राष्ट्रवादीत डेरेदाखल झाल्याने जवळा जिल्हा परिषद गटातील राजकीय समीकरणे बदलले आहेत.

युवा नेते प्रशांत शिंदे यांच्यासह जवळ्याच्या सरपंच वैशाली सुभाष शिंदे, उपसरपंच रोहिणी काकासाहेब वाळूंजकर, काकासाहेब वाळूंजकर, सावता ग्रुप अध्यक्ष प्रमोद कोल्हे, वंजारवाडीचे भाजपा नेते रामकिसन जायभाय, कवडगावचे सरपंच सीताराम कांबळे, सावरगावचे सरपंच काकासाहेब चव्हाण, चेअरमन दादासाहेब ढवळे, उपसरपंच सचिन ढवळे, माजी सरपंच अनिल माने, महादेव फाळके, दादासाहेब थोरात, सह आदी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादीत प्रवेश केलेले बहुतांश जण भाजपचे कार्यकर्ते आहेत. प्रशांत शिंदे यांनी आपल्या समर्थकांसह जोरदार शक्तिप्रदर्शन करीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आक्रमकपणे सक्रीय झाला आहे. येणाऱ्या सर्व निवडणूका एकहाती जिंकण्याचे व्यूहरचना राष्ट्रवादीने आखल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीने हाती घेतलेल्या इनकमिंग मोहिमेचा सर्वाधिक फटका भाजपला बसताना दिसत आहे. भाजपमधून सुरू झालेली गळती रोखण्यासाठी भाजपला तातडीने पाऊले उचलावी लागतील. अन्यथा अगामी काळात भाजपला मोठे भगदाड पडण्याचा धोका आहे.