ओमिक्रॉनचा विस्फोट सुरूच ; ओमिक्रॉनची वाटचाल द्विशतकाकडे  : महाराष्ट्रात कोरोनाची आजची स्थिती काय जाणून घ्या सविस्तर

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : राज्यात ओमिक्रॉनचा उद्रेक वाढू लागला आहे. रविवारी दिवसभरात  राज्यात तब्बल 31 जणांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.राज्यात रविवारी आढळून आलेल्या नव्या ओमिक्रॉन बाधितांमध्ये मुंबईतील 27 जण आहेत. तर ठाण्यातील दोन तसेच पुणे ग्रामीण आणि अकोला येथील एका रुग्णांचा समावेश आहे. (Omicron blast in Mumbai; So many patients were found on the same day)

राज्यात आतापर्यंत 141 जणांना ओमिक्रॉनची बाधा झाली आहे. त्यातील 61 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रविवारी दिवसभरात 31  ओमिक्रॉनचे रुग्ण राज्यात आढळले असून, त्यातील 18 वर्षाखालील सहा, 60 वर्षावरील तीन रूग्ण आहेत. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये 17 पुरुष तर 14 महिलांचा समावेश आहे.

31 ओमिक्रॉन रूग्णांपैकी 30 जणांचा आंतरराष्ट्रीय प्रवासाचा इतिहास आहे. तर एक जण संपर्कातील आहे. 22 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. 31 रूग्णांपैकी 29 जणांना कोणतीही लक्षणे नाहीत तर 2 जणांना सौम्य लक्षणे आहेत, असे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले. (Omicron blast in Mumbai; So many patients were found on the same day)

राज्यात कोरोनाची स्थिती काय ?

दरम्यान राज्यात दिवसभरात 1648 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर 17 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच 918 जण बरे होऊन आज घरी परतले आहेत. राज्यात आज अखेर सक्रीय कोरोना बाधितांची संख्या 9 हजार 813 इतकी आहे अशी माहिती राज्य आरोग्य विभागाने जारी केली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाची स्थिती काय ?

रविवार दि 26 डिसेंबर अखेर अहमदनगर जिल्ह्यात 425 सक्रीय कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आहे.आज 37 रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या 56 बाधितांची रुग्ण जिल्ह्यात भर पडली आहे. आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक 52 रूग्ण एकट्या जवाहर नवोदय विद्यालय टाकळी ढोकेश्वर येथील आहेत. अहमदनगर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.89 टक्के इतके आहे.