Corona entry in Maharashtra Legislature winter session | हिवाळी अधिवेशनात कोरोनाची एन्ट्री : 1500 जणांचे कोरोना तपासणी अहवाल आले समोर; आढळले ‘इतके’ रूग्ण

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : महाराष्ट्रात कोरोना आणि ओमिक्रॉनचा फैलाव वाढू लागल्याने चिंता वाढलेल्या असतानाच विधिमंडळातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अधिवेशन काळात भाजपा आमदार समीर मेघे कोरोना बाधित झाल्यानंतर शनिवारी आरोग्य विभागाने 1500 जणांची कोरोना तपासणी केली होती याचा अहवाल आता समोर आला आहे.(Corona entry in Maharashtra Legislature winter session)

विदर्भातील भाजपा आमदार समीर मेघे हे राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी झाले होते. याच काळात ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. याबाबतची माहिती त्यांनी फेसबुक पोस्टवरून दिली होती. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या आरोग्य विभागात विधिमंडळ परिसरात कोरोना तपासणी हाती घेतली होती.

आरोग्य विभागाने शनिवारी 25 रोजी 1500 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. या तपासणीचा अहवाल रविवारी समोर आला असून यात 32 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे या 32 जणांमध्ये एकाही आमदाराचा समावेश नाही. सर्व 32 कोरोनाबाधित हे कर्मचारी असल्याची माहिती समोर येत आहे. (Corona entry in Maharashtra Legislature winter session, corona inspection report of 1500 people found 32 patients)

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 22 डिसेंबर पासून सुरू झाले होते. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्व आमदार व कर्मचारी यांच्या कोरोना तपासण्या करण्यात आल्या होत्या. सर्व खबरदारीच्या उपाययोजना करूनही अधिवेशनात कोरोनाचा शिरकाव झाला आहे.  नव्याने आढळून आलेल्या नव्या कोरोनाबाधितांमध्ये पोलिस कर्मचारी, मंत्रालयीन कर्मचारी, विधानभवनातील कर्मचारी यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात कोरोनाबाधित रूग्ण संख्या वाढू लागल्याने राज्य सरकारने राज्यात कठोर निर्बंध लागू केले आहेत.  रात्री 09 ते 06 या काळात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच अन्य अनेक गोष्टींवर  निर्बंध लादण्यात आले आहेत. राज्यात पुन्हा लाॅकडाऊन लागणार नाही यासाठी सरकार कठोर उपाययोजना राबवत आहे. नागरिकांनी शासनाने घालून दिलेले नियम पाळून राज्यात पुन्हा लाॅकडाऊन लागणार नाही याची दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. (Corona entry in Maharashtra Legislature winter session, corona inspection report of 1500 people found 32 patients)