nashik police demolish counterfeit note factory | बाबो ! कोरोनाने रोजगार हिरावला आणि पठ्ठ्यांनी नोटा छपाईचाच कारखाना उघडला !

सात जणांना नाशिक पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नाशिक Nashik Crime News : कोरोना महामारीमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले. लाॅकडाऊनचा फटका बसल्याने अनेकांची रोजी रोटी हिरावली गेली. छोटे व्यवसाय पार उध्वस्त झाले. असे असतानाच काही भामटय़ांनी एकत्रित येत कोरोनामुळे बंद पडलेल्या व्यवसायाला संधी मानले आणि थेट बनावट नोटा तयार करण्याचाच कारखाना सुरू करण्याचा महापराक्रम केला आहे. (nashik police demolish counterfeit note factory)

भाजी विक्रेत्या महिलेला बनावट नोट गेली अन या भामट्यांचा भांडाफोड झाला. बनावट नोटा तयार करण्याचा कारखाना पोलिसांनी उध्वस्त केला आहे. हा धक्कादायक प्रकार नाशिक जिल्ह्यातून उजेडात आला आहे.

कलर प्रिंटिंगचा व्यवसाय बंद असल्याने चक्क बनावट नोटांचा छापखाना सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. नाशिक पोलिसांनी हा छापखाना उद्ध्वस्त केला असून, या प्रकरणात एकूण सात जणांना अटक केली आहे. (Seven people have been arrested)

नाशिकमधील सुरगाणा तालुक्यातील (Surgana in Nashik) हा धक्कादायक प्रकार आहे. या छापखान्याचे धागेदोरे लासलगाव जवळील विंचूरपर्यंत असल्याचेही पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. अटक केलेल्या आरोपींनी या छापखान्याच्या माध्यमातून आतापर्यंत लाखो रूपयांच्या बनावट नोटा छापल्या आहेत.

कोरोना तसेच टाळेबंदीमुळे नाशिकमधील काही तरुणांचा रोजगार गेला. कलर प्रिंटिंगचा व्यवसायही ठप्प झाला होता. हाताला काम नसल्यामुळे या तरुणांनी नोटांचा छापखाना सुरू केला. या छापखान्यात आरोपी वेगवेगळ्या बनावट नोटा छापत होते. मागील तीन महिन्यांपासून बनावट नोटा छापण्याचे काम या तरुणांकडून सुरू होते. (nashik police demolish counterfeit note factory)

विशेष म्हणजे, नोटा छापण्याचे तसेच त्या बाजारात आणण्याचे काम अगदी नियोजनबद्ध पद्धतीने केले जायचे. मागील तीन महिन्यांपासून दैनंदिन व्यवहारात बनावट नोटा आणल्या जात होत्या. मात्र, हा प्रकार समोर यायला जास्त वेळ लागला नाही.(nashik police demolish counterfeit note factory)

आजूबाजूच्या व्यापार्‍यांकडे बनावट नोटा येण्याचे प्रमाण वाढले होते. एका भाजी विक्रेत्या महिलेलाही बनावट नोट गेली होती. तिने यासंबंधी तक्रार केली होती. त्याआधी व्यापाऱ्यांकडूनही तक्रारी सुरू होत्या. पोलिसांनी यासंबंधी सखोल तपास केला असता आरोपींच्या कारनाम्याचा पर्दाफाश झाला. (nashik police demolish counterfeit note factory)

दरम्यान, या कारवाईत नाशिक पोलिसांनी एकूण सात जणांना अटक केली आहे. कलर प्रिंटरचा व्यवसाय बंद असल्याने बनावट नोटा छापण्याचे धाडस अटक केलेल्या लोकांनी केले. या घटनेमुळे गुन्हेगारी क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. (nashik police demolish counterfeit note factory)

दरम्यान या सात जणांचा बनावट नोटा छापाईचा हा गोरख धंदा कुणाच्या आशीर्वादाने सुरू होता ? यात आणखी बडे मासे गुंतले आहेत का ? या शोध नाशिक पोलिसांकडून वेगाने घेतला जात आहे.