Sand Smuggler : वाळूतस्कराने तहसीलदारांच्या खात्यावर धाडले थेट 50 हजार रूपये !  

तहसीलदारांची लाचलुचपत विभागाकडे तक्रार

पुणे Pune Crime News : अवैध्य वाळू वाहतुक करताना पकडलेला ट्रक सोडण्यासाठी वाळूतस्कराने (Sand Smuggler) डायरेक्ट तहसीलदारांच्या बँक खात्यावर गुगल पे द्वारे (Google Pay) 50 हजार रूपये धाडण्याचा पराक्रम केला आहे. तहसीलदारांना बळजबरीने 50 हजाराची लाच देण्याचा हा प्रकार तहसीलदारांनी हाणून पाडला आहे. तहसीलदारांनी (Haveli Tehsildar Trupti Kolte) घडल्या प्रकाराबाबत थेट पोलिस ठाणे व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार पुण्याच्या हवेली तहसील कार्यालयातून समोर आला आहे.( Haveli Tahsildar Pune)

पुणे-सोलापूर महामार्गावरील शेवाळवाडी बसडेपो जवळ MH 16.T.4100 हा ट्रक बेकायदा वाळू वाहतूक करीत असल्याचे हवेलीच्या  तहसीलदार तृप्ती कोलते (Haveli Tehsildar Trupti Kolte) यांना आढळून आला होता. त्यावेळी ट्रक चालक गाडीची चावी घेऊन उडी मारून पळून गेला होता.

तहसीलदार कोलते यांनी हडपसरचे मंडलाधिकारी व्यंकटेश चिरमुल्ला यांना तलाठी किंवा कोतवाल यांना घटनास्थळी पाठवण्यास सांगितले होते. ते येईपर्यंत तहसिलदार कोलते ह्या गाडीत बसून होत्या त्याचवेळी त्या ठिकाणी गाडी मालक असलेला तरूण आला व कोलते यांना गाडी सोडण्याची विनंती करू लागला.व पैशाचे आमिष देऊ लागला.यावेळी कोलते यांनी वाळू तस्करास (Sand Smuggler) स्पष्ट नकार देऊन कारवाई करणार असल्याचे सांगितले होते.

कोतवाल तंगडे घटनास्थळी आल्यानंतर तहसीलदार कोलते यांनी गाडीचा पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या.गाडी कोतवालाच्या ताब्यात देऊन तहसीलदार कार्यालयात गेल्या.प्रवासात संबंधित वाळूतस्कर (Sand Smuggler) तहसीलदारांच्या गाडीचा पाठलाग दुचाकीवरून पाठलाग करत गाडी थांबवावी म्हणून खाणाखुणा करू लागला त्याला न जुमानता कोलते  कार्यालयात गेल्या व त्यांचे नियमित कामकाज सुरू केले.

सायंकाळी पाच वाजणेच्या सुमारास एका भ्रमणध्वनीवरून कोलते यांना चार मिस कॉल आले. त्या बैठकीत असल्याने त्यांनी ते कॉल स्वीकारले नाही.तथापी वारंवार फोन येत असल्याने त्यांनी त्या भ्रमणध्वनीवर बैठकीनंतर कॉल केला. त्यावेळी फोनवरून बोलणाऱ्या व्यक्तीने त्यांचा बँक खाते नंबर मागितला आणि त्या खात्यात पैसे जमा करायचे आहे असे सांगितले.

पैसे कशाबद्दल जमा करायचे आहेत. असे विचारल्यावर त्यांनी सांगितले की तुम्ही जी वाळूची गाडी पकडली आहे त्या गाडीच्या मालकाने तुमच्या अकाउंट वर पैसे जमा करण्यास सांगितले म्हणून तुमचा बँक खाते नंबर द्या असे बोलू लागला .

यानंतर फोनवरून बोलणाऱ्या व्यक्तीस कोलते यांनी खडसावून तुमच्या विरोधात मला लाच देत असल्याबाबत ची तक्रार देणार असल्याचे सांगितले.त्यानंतर नियमित काम उरकून कोलते या घरी जाण्यास निघाले असता त्यांच्या चालकाने सांगितले की,आज पकडलेल्या अनाधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या गाडीचा मालक व काही लोक गाडी जवळ आहेत.आणि तुमच्या सेविंग अकाउंटवर पन्नास हजार रुपये जमा केले आहेत असे सांगत होते.(Sand smugglers deposit Rs 50000 in tehsildar’s account)

यानंतर कोलते यांनी त्यांचे बँक खाते तपासले असता आधी एक रुपया जमा झाला व त्यानंतर 50 हजार रुपये जमा झाल्याचे आढळले हे पैसे  अनोळखी व्यक्तीकडून ‘गुगल पे ‘द्वारे  सायंकाळी चार वाजून पाच मिनिटांनी जमा झाल्याचे दिसून आले. (Sand smugglers deposit Rs 50000 in tehsildar’s account)

या दरम्यान अनाधिकृत वाळू वाहतूक करणारा ट्रक तहसील कार्यालय हवेलीच्या आवारात असल्याबाबतचा तलाठी यांचा अहवाल कोलते यांच्या कार्यालयात जमा झाला आहे. हा ट्रक चोरीला जाऊ नये याकरिता सुरक्षारक्षक मिळावा म्हणून  जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांनासुद्धा मेल द्वारे कळविले आहे.तरीही सदर वाहन चालकाने त्याचा ट्रक सोडविण्याकरिता कोलते यांना बळजबरीने लाच देऊ केली असल्याने तहसीलदार कोलते यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. तसेच स्थानिक खडक पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद स्टेशन डायरी मध्ये घेण्याबाबत कळविले आहे.

Web title : Sand smugglers deposit Rs 50000 in tehsildar’s account