मोठी बातमी : भाजपने केली राज्यातील 70 जिल्हाध्यक्षांची घोषणा, अहमदनगर भाजपचे कारभारी कोण ? पहा एका क्लिकवर राज्यातील सर्व नवनियुक्त भाजपा जिल्हाध्यक्षांची यादी !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : भारतीय जनता पार्टीने (BJP) अगामी 2024 च्या लोकसभा व विधानसभा (LokSabha Vidhansabha Election 2024) निवडणुकांची तयारी वेगाने हाती घेतली आहे.त्यादृष्टीने भाजपने राज्यात संघटनात्मक बदल सुरू आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी राज्यातील भाजपच्या (BJP NEWS) 70 जिल्हाध्यक्षांची घोषणा केली आहे. यामध्ये शहर व ग्रामीण जिल्हाध्यक्षांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. यात अहमदनगर (Ahmednagar BJP) जिल्ह्यातील कारभाऱ्यांच्याही निवडी घोषित करण्यात आल्या आहेत. (BJP has announced 70 district presidents in maharashtra)

maharashtra BJP president Chandrashekhar Bawankule big announcement, BJP has announced 70 district presidents in maharashtra, who is bjp caretaker of Ahmednagar district? Read on

“अहमदनगर शहर जिल्हाध्यक्षपदी अभय आगरकर (Abhay Agarkar) यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यापुर्वी भैय्या गंधे (Bhaiyya Gandhe) हे शहर जिल्हाध्यक्ष होते.अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी दिलीप भालसिंग (Dilip BhalSingh) तर अहमदनगर उत्तरचे जिल्हाध्यक्षपदी विठ्ठलराव लंघे (Vitthalrao Langhe) यांच्या निवडीची घोषणा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केली आहे.

maharashtra BJP president Chandrashekhar Bawankule big announcement, BJP has announced 70 district presidents in maharashtra, who is bjp caretaker of Ahmednagar district? Read on

अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष अरूण मुंढे (Arun Mundhe) यांच्या रिक्त जागेवर वर्णी लागावी यासाठी जिल्ह्यातील अनेक जण इच्छुक होते. त्यातून दिलीप भालसिंग यांची भाजपच्या अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी पक्षाने निवड केली.

maharashtra BJP president Chandrashekhar Bawankule big announcement, BJP has announced 70 district presidents in maharashtra, who is bjp caretaker of Ahmednagar district? Read on

“राज्यातील भाजपा जिल्हाध्यक्षांची घोषणा केल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP state president Chandrasekhar Bawankule) म्हणाले, भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेतील महत्वपूर्ण दुवा असलेल्या जिल्हाध्यक्षांची नवी टीम जाहीर करत आहे. राज्यातील केंद्रीय नेतृत्व, राज्याचे नेतृत्व आणि प्रदेश कार्यकारिणीशी चर्चा करून ७० संघटनात्मक जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. मला खात्री आहे, माझे नवनियुक्त  सहकारी पक्षासाठी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावतील. या सर्वच सहकाऱ्यांच्या सोबतीने 2024 च्या महाविजयासाठी आम्ही सज्ज होत आहोत”

maharashtra BJP president Chandrashekhar Bawankule big announcement, BJP has announced 70 district presidents in maharashtra, who is bjp caretaker of Ahmednagar district? Read on

भाजपा नव्या भारताच्या उभारणीसाठी कटिबध्द आहे. पक्षाच्या बांधणीत कार्यकर्त्यांचे  योगदान सर्वोच्च आहे. पक्षासाठी कार्यकर्ते सर्वस्व असून त्यांच्या अविश्रांत कष्टामुळे पक्षाने आज नवी उंची गाठली आहे. नवनियुक्त सर्व जिल्हाध्यक्षांनी सर्वांना सोबत घेऊन पक्ष मजबूत करायचा आहे.सर्वांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.