Corona Update Jamkhed News | सावधान : जामखेड तालुक्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले; मंगळवारी दिला मोठा दणका

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून थंडावलेला कोरोना पुन्हा सक्रीय झाला आहे. मागील काही दिवसांत कोरोनाचे जेमतेम रूग्ण तालुक्यात सापडत होते. तालुक्यात सध्या लसीकरणाने वेग पकडला आहे. परंतु आता कोरोना पुन्हा सक्रीय होऊ लागल्याने तालुकावासियांच्या चिंता वाढल्या आहेत. (Corona Update Jamkhed News)

मंगळवारी कोरोनाने उचल खाल्ली आहे. कोरोनाने उग्र रूप धारण करत मोठा दणका दिला आहे. मंगळवारी 14 रोजी जामखेड तालुका आरोग्य विभागाने 691 नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या केल्या आहेत. (Corona Update Jamkhed News)

रॅपिड अँटीजेन चाचण्यांमध्ये धोंडपारगाव 01, रत्नापुर 01, जवळके 03, पाडळी 02, वाघा 02 , सौताडा 02 असे 11 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. (Corona Update Jamkhed News) तर RTPCR अहवालात  जामखेड शहर 06, भवरवाडी 01, खर्डा 01, पाटोदा 01, डिसलेवाडी 01, धानोरा 03, जामवाडी 01, रत्नापुर 01, पिंपरखेड 02 असे 17 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. (Corona Update Jamkhed News )

रॅपिड अँटीजेन चाचण्या व RTPCR अहवाल असे मिळून जामखेड तालुक्यात एकुण 28 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून जामखेड तालुक्यात कोरोना थंडावलेला होता. यामुळे तालुका कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करतो की काय असे चित्र निर्माण झालेले असतानाच मंगळवारी कोरोनाने पुन्हा एकदा मोठी दणका देत बेफिकीर नागरिकांना इशारा दिला आहे.

जामखेड तालुका आरोग्य विभागाने मंगळवारी दिवसभरात एकुण 341 नागरिकांचे RTPCR स्वॅबनमुने कोरोना तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात पाठवले आहेत अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक संजय वाघ यांनी दिली आहे. (Corona Update Jamkhed News)