Saif Ali Khan Attack: सैफ अली खानवर हल्ला कसा झाला? मोलकरणीच्या जबाबातून धक्कादायक माहिती समोर

Saif Ali khan Attack : बाॅलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर गुरूवारी पहाटे प्राणघातक हल्ला झाला. सैफ अली खान आपल्या घरात कुटूंबियासह झोपलेला असताना त्याच्यावर हा हल्ला झाला.सैफवर चाकू हल्ला करण्यात आलाय. त्याच्यावर सहा वार करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.सैफला उपचारासाठी लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.सैफच्या मोलकरणीचा (maid) जबाब पोलिसांनी (mumbai police) नोंदवला असून त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. (saif ali khan latest news in marathi)

Saif Ali Khan Attack, How Saif Ali Khan was attacked? Shocking information is revealed from the maid's answer, saif ali khan health Update today, marathi news,

सैफ अली खान सह त्याच्या मोलकरणीवरही हल्ला झाला आहे. यात ती जखमी झाली आहे. त्याच्यावरही उपचार करण्यात आले आहेत. पोलिसांनी तीचा जबाब नोंदवला आहे. यात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बुधवारी रात्री एक अज्ञात व्यक्ती सैफच्या घरात घुसला आणि मोलकरणीसोबत वाद घालू लागला. हा वाद सोडवण्यासाठी सैफने मध्यस्थी केली असता त्या व्यक्तीने सैफवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला, असे मोलकरणीने आपल्या जबाबात माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. (Saif Ali Khan Health News)

याबाबत सविस्तर असे की, सैफ अली खान हा आपल्या घरात कुटूंबियासह झोपेत असताना गुरूवारी पहाटे अडीचच्या सुमारास त्याच्या बंगल्यात अज्ञात व्यक्तीने प्रवेश केला आणि त्यानंतर सैफ अली खानवर हल्ला केला. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला आहे. सैफला सहा जखमा झाल्या आहेत. यातील दोन जखमा खोलवर आहेत. एका जखमेचा व्रण त्याच्या पाठीच्या कण्याजवळ आहे. तसेच त्याच्या मानेलाही १० सेंटीमीटरची जखम झाली आहे. न्यूरोसर्जन डाॅ नितिन डांगे व सौंदर्य शास्त्र तज्ञ डाॅ लीना जैन यांच्या देखरेखीखाली त्याच्यावर शस्त्रक्रीया सुरू आहे, अशी माहिती लिलावती रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निरज उत्तमानी यांनी दिली.

दरम्यान, सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. सैफवर कोणत्या कारणातून हल्ला करण्यात आला याचा पोलिस वेगाने शोध घेत आहेत. वांद्रे पोलिसांनी एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी अनेक पोलिस पथके तयार करण्यात आली आहेत.

एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले की, “हल्ल्याच्या नेमक्या कारणांचा शोध घेणे सुरू आहे. मुंबई क्राइम ब्रांचही या घटनेचा सखोल तपास करत आहे.” मुंबई पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला लवकरात लवकर पकडण्यासाठी विशेष पथके तैनात केली आहेत. सध्या घरातील सीसीटीव्ही फूटेज आणि इतर पुरावे गोळा करून तपास करण्यात येत आहे.