Nitin Desai Suicide : धक्कादायक ! नितीन देसाईंवर होतं 250 कोटींचं कर्ज; कर्जबारीपणाला कंटाळून की अन्य कारणाने आत्महत्या? पोलीसांचा तपास सुरू !

मुंबई : Nitin Desai Suicide : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी कर्जत (रायगड) येथील एन डी स्टुडिओत आत्महत्या (Suicide) केल्याची घटना आज उघडकीस आली. या घटनेने हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत मोठी खळबळ उडाली आहे. नितीन देसाई यांनी आत्महत्या का केली असावी याचा पोलिसांकडून वेगाने शोध सुरू आहे. परंतू त्यांच्या आत्महत्येमागे कर्जबाजारीपणाचे कारण असल्याचे आता बोलले जात आहे.

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब बुधवारी समोर आली. कर्जत येथील एन. डी. स्टुडिओमध्येच त्यांनी आत्महत्या केली.देसाई यांच्या आत्महत्येवर कलाक्षेत्र, राजकीय क्षेत्र व सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. (Nitin Desai Suicide)

गेल्या अनेक वर्षांपासून नितीन देसाई यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी भव्य-दिव्य सेट उभारले होते. दिग्गज दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केलं होतं. नितीन देसाई हे अतिशय उत्कृष्ट कलाकार होते. त्यांनी अनेक चित्रपटांचे सेट उभारण्याचे काम केले. तसेच महाराष्ट्राच्या अनेक मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचे स्टेज उभारण्याचे काम ते करायचे.असं असताना त्यांच्यावर मृत्यूपूर्वी तब्बल २४९ कोटींचं कर्ज होतं, अशी माहिती आता समोर आली आहे. (Nitin Desai Suicide)

Nitin Desai had debt of 250 crores, nitin desai suicide latest news,

दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मृतदेह बुधवारी सकाळी एन. डी. स्टुडिओमधील त्यांच्या खोलीत आढळून आला. सफाई कर्मचारी खोलीत साफसफाईसाठी गेले असताना ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. (Nitin Desai Suicide)

त्यांनी तातडीने पोलीसांना या घटनेची माहिती कळवली. यानंतर कर्जत आणि खालापूर येथील पोलीस तातडीने घटनास्थळी हजर झाले. पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. दरम्यान या घटनेचे सर्व पैलू तपासून पाहत असल्याचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले आहे. (Nitin Desai latest news today)

दरम्यान, कर्जबाजारीपणाला कंटाळून नितीन देसाई यांनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे.नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणात नेमकं काय घडलं? याचा पोलिसांकडून वेगाने तपास केला जात आहे. (Nitin Desai Suicide news)

एन. डी. स्टुडिओवर होतं जप्तीच्या कारवाईचे संकट (Nitin Desai Suicide)

ठराविक मुदतीसाठी घेतलेले कर्ज न फेडल्यामुळे नितीन देसाई यांच्या कर्जत चौक येथील एन. डी. स्टुडिओवर जप्तीच्या कारवाईचे संकट ओढावले होते. कलिना येथील एडलवाईस ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीने एन. डी. स्टुडिओ जप्तीसाठी रायगडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात अर्जही केला होता. (Nitin Desai Suicide case)

पण जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जप्तीच्या कारवाईला अंतिम मंजूरी दिली गेली नव्हती. रायगडचे निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी एन. डी. स्टुडिओच्या जप्तीसंदर्भात अर्ज कार्यालयाकडे आला असल्याचे सांगितले आहे. (Nitin Desai news)

नितीन देसाई यांनी काही कारणास्तव सीएफएम या वित्तीय संस्थेकडून १८० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. २०१६ आणि २०१८ अशा दोन वर्षांत या कर्जाचा करारनामा झाला होता. यासाठी देसाई यांनी तीन वेगवेगळ्या अशा चाळीस एकरच्या मालमत्ता तारण ठेवल्या होत्या. (Nitin Desai latest update)

काही कालावधीनंतर सीएफएम या वित्तीय संस्थेने आपल्याकडील सर्व कर्ज खाते एडलवाइस ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीकडे सोपवली.परंतु कर्जाची वसुली होत नव्हती.

त्यामुळे सुरुवातीला १८० कोटींवर असणारी कर्जाची रक्कम व्याजासह २४९ कोटींच्या आसपास पोहोचली.त्यामुळे देसाई हे आर्थिक विवंचनेत होते. खालापूरचे आमदार महेश बालदी यांच्याकडे काही दिवसांपूर्वीच त्यांनी या संदर्भातील चर्चाही केली होती.

नितीन देसाई (Nitin Desai Suicide) यांचा प्रवास

1993 साली आलेल्या विधु विनोद चोप्रा यांच्या ‘1942 अ लव स्टोरी’ या चित्रपटाच्या सेटमुळे नितीन देसाई यांना खरी ओळख मिळाली. त्यानंतर ‘हम दिल दे चुके सनम’, ‘लगान’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘देवदास’, ‘जोधा अकबर’, ‘खाकी’ अशा चित्रपटांसाठीही त्यांनी भव्य दिव्य सेट डिझाईन केले. त्यानी आत्तापर्यंत 178 हून सेट डिझाइन केले आहेत.

नितीन देसाई यांना लगान, हम दिल दे चुके सनम यांसारख्या चित्रपटांसाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 2000 साली ‘हम दिल दे चुके सनम’ आणि 2003 मध्ये ‘देवदास’ या चित्रपटांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शकाच्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते.