Nitin Desai Death Case: धक्कादायक ! धनुष्यबाणाच्या मधोमध उभं राहून नितीन देसाईंनी संपवली जीवनयात्रा, प्रत्यक्षदर्शीच्या खुलाश्याने उडाली खळबळ

मुंबई  : Nitin Desai Death Case: ज्या स्वप्नासाठी जीवाचं रान केलं, तेच स्वप्न सत्यात उतरवलेल्या एनडी स्टुडिओमध्ये (ND Studio Karjat) प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी अखेरचा श्वास घेतला. नितीन देसाई यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. देसाई यांच्या आकस्मित निधनामुळे (Death) सिनेसृष्टी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक वर्तुळातील सर्वांनाच जबरदस्त धक्का बसला.देसाई यांनी आत्महत्या (Suicide) केलेल्या ठिकाणाहून पोलिसांनी (Police) व्हाईस रेकॉर्डर जप्त केले. (Voice recorder seized) यात चार उद्योजकांची नावे असल्याचे बोलले जात आहे. आता या प्रकरणात आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Nitin Desai Death Case, Shocking, Nitin Desai ended his journey by standing in middle of a bow and arrow revelation of eyewitness caused great stir)

कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी एनडी स्टुडिओमध्ये ज्या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केली त्या ठिकाणी जमीनीवर दोरीच्या सहाय्याने धनुष्यबाण बनवण्यात आला होता. याच धनुष्यबाणावर उभे राहून देसाई यांनी गळफास घेतला होता, अशी धक्कादायक माहिती घटनास्थळी दाखल झालेल्या एका तरूणाने माध्यमांशी बोलताना दिली. यामुळे आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. (Nitin Desai Death Case Latest update)

“याबाबत अधिक माहिती देताना मयुर नावाचा तरूण म्हणाला की, गेल्या पाच दहा वर्षांपासून मी नेहमी एनडी स्टुडिओत येत असायचो,आमच्या भागातले अनेक जण स्टुडिओत कामाला होते. मी मात्र कामाला येत नव्हतो. माझे आणि नितीनदादांचे चांगले संबंध होते.माझे वडील व काका स्टुडिओचे मॅनेजमेंट पहायचे.आमच्या गावातील एक मुलगा नितिन दादांच्या अगदी जवळचा होता.त्याला दादांनी सकाळी साडेआठ वाजता स्टुडिओत त्यांच्या ऑफीसला बोलवले होते. त्या ठिकाणी एक रेकॉर्डर मिळेल ते तु ओपन करून पहा असं नितिन दादांनी त्याला सांगितलं होतं, अशी माहिती मयूरने माध्यमांशी बोलताना दिली.” (Nitin Desai Death Case)

Nitin Desai Death Case, Shocking, Nitin Desai ended his journey by standing in middle of a bow and arrow revelation of eyewitness caused great stir

“नितिन दादांनी सांगितल्या प्रमाणे तो मुलगा ऑफिसला पोहचला, त्याने रेकॉर्डर ताब्यात घेतलं, ते चालू केलं, त्यात दादांनी असं रेकॉर्ड केलं होतं की मी अमूक अमूक सेटवर आहे, तू तिथं ये. त्यामुळे त्याने पुढचं काही न ऐकता सरळ सेटवर गेला, तेव्हा त्याने सेटवर जे काही पाहिलं, ते पाहून त्याने सगळ्यात आधी आम्हाला फोन केला आणि बोलावून घेतलं. आम्ही सेटवर गेल्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना कळवली, असे मयूर म्हणाला.” (Nitin Desai latest news today)

सेटवर पोहचल्यानंतर नेमकं काय पाहिलं? याविषयी माहिती देताना मयूर म्हणाला की, जेव्हा आम्ही आतमध्ये गेलो तेव्हा जमीनीवर दोरीने एक भलामोठा धनुष्यबाण बनलं होतं, त्यावर मधोमध नितिनदादांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह लटकलेला होता.नितीनदादांनी धनुष्यबाण का बनवलं असेल? याचं कारण काही माहित नाही, सेटवर धनुष्यबाण नव्हते, ते त्यांनी कालच बनवलं असावं, अशी माहिती देत मयूर म्हणाला की, नितीनदादांनी धनुष्यबाण का बनवलं असेल? याचा आम्हाला प्रश्न पडलाय, त्यांना नेमकं काय सुचवायचं असेल? त्यांना यातून काय मेसेज द्यायचा असेल? खरं तर त्यांनाच याबाबत माहित, असं मयूर म्हणाला. (Nitin Desai Death Case)

नितीन देसाई (Nitin Desai Death Case) यांच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण

कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्यानंतर एनडी स्टुडिओमध्ये पोहचलेल्या स्थानिक तरुणांपैकी मयूर या तरूणाने ऑन द स्पाॅट जे दिसलं, त्यावर दिलेली माहिती धक्कादायक अशी आहे. नितीन देसाई यांच्या लटकलेल्या मृतदेहाखाली आढळून आलेले धनुष्यबाणाचे चिन्ह नितीन देसाई यांच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारे ठरले आहे. नितीन देसाई यांच्यावर 250 कोटींचं कर्ज होतं. देसाई यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात होता.परंतू घटनास्थळाहून व्हाईस रेकॉर्डर जप्त केल्यानंतर त्यात चार उद्योजकांची नावे समोर आली. यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले.परंतू मयूर नावाच्या तरूणाने दिलेल्या माहितीनुसार पुन्हा या प्रकरणात नवा ट्विट आला आला आहे.

नितीन देसाई आत्महत्या आणि धनुष्यबाण..

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या करताना दोरीच्या सहाय्याने धनुष्यबाण बनवले. त्याच्या मधोमध उभे राहून गळफास घेत आपली जीवनयात्रा का संपवली असावी? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. नितीन देसाई यांच्या आत्महत्येचा आणि धनुष्यबाण यांचे नेमके कनेक्शन काय? याचाही पोलिसांना तपास करावा लागणार आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.