Nashik Accident latest news : मोठी बातमी ! वणी – सापुतारा महामार्गावरील भीषण अपघातात 4 जण ठार तर 9 जण गंभीर जखमी

नाशिक, 30 जून 2023 : Nashik Accident latest news  :  नाशिक जिल्ह्यातून भीषण अपघाताची मोठी घटना समोर आली आहे. या घटनेत एकाच गाडीतून प्रवास करणाऱ्या चौघा मित्रांवर काळाने घाला घातला आहे. या अपघातात इतर 9 जण गंभीर जखमी झाले आहेत.ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.जखमींवर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Nashik Accident latest news, Four people were killed and 9 seriously injured in horrific accident on Vani-Saputara highway today,

नाशिक जिल्ह्यातील वणी – सापुतारा महामार्गावर मारूती सियाज आणि क्रुझर यांची समोरासमोर धडक झाली. हा भीषण अपघात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास खोरी फाट्यानजीक झाला.या घटनेत वणी येथील चौघा मित्रांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये विनायक गोविंद क्षिरसागर वय 37, योगेश दिलीप वाघ वय 18, जतीन अनिल पावडे वय 23 व रविंद्र मोतीराम चव्हाण वय 22 रा मोठा कोळीवाडा वणी यांचा समावेश आहे. ( Nashik Accident latest news, Four people were killed and 9 seriously injured in horrific accident on Vani-Saputara highway today)

विनायक गोविंद क्षिरसागर, योगेश दिलीप वाघ, जतीन अनिल पावडे, व रविंद्र मोतीराम चव्हाण हे चौघे मित्र सियाज गाडीतून (MH 41 V 7787) सापुताऱ्याहून वणीला जात होते. त्याचवेळी खोरी फाट्यानजीक समोरून येणाऱ्या क्रुझर गाडीने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, विनायक गोविंद क्षिरसागर  योगेश दिलीप वाघ या दोघांचा जाग्यावर मृत्यू झाला. तर जतीन अनिल पावडे व रविंद्र मोतीराम चव्हाण या दोघांचा उपचारादरम्यान नाशिक जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.

तर क्रुझर मधील कमळी युवराज गांगोडे वय ४०, कल्पना सुभाष सोळसे, वय १९, तुळशीराम गोविंदा भोये वय २८, ललीता युवराज कडाळे वय ३०, रोहिदास पांडुरंग कडाळे, वय २५, योगेश मधुकर सोळसे वय १५, सुभाष काशिनाथ सोळसे वय १५, देवेंद्र सुभाष सोळसे, वय ४७, नेहल सुभाष सोळसे वय ७ हे सर्व रा. केळवण, ता. सुरगाणा हे गंभीर जखमी झाले. वणी ग्रामिण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर त्यांना १०८ व खाजगी रुग्णवाहिकेने नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.