Jitendra Awhad daughter Natasha Awhad | आमदार जितेंद्र आव्हाडांवरील गुन्ह्याप्रकरणी मुलीने केली भूमिका स्पष्ट, नताशा आव्हाड म्हणाल्या..

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awhad) यांच्यावर विनयभंगांचा गुन्हा दाखल झाला आहे. यावरून राजकीय वर्तुळात मोठा गदारोळ उठला आहे. राष्ट्रवादीसह शिवसेना नेते आव्हाड यांच्या बाजूनं बोलत आहेत. त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशा आव्हाड (Jitendra Awhad daughter Natasha Awhad ) यांनी या प्रकरणावरून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

molestation case has been filed against MLA Jitendra Awhad, Natasha Awhad say,Jitendra Awhad daughter Natasha Awhad,

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका महिलेने विनयभंग केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळातून सरकारविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. आव्हाड यांच्या पत्नीने संबंधित व्हिडीओ क्लीप दाखवत यात कुठं विनयभंग झाला, ते तुम्हीचं ठरवा असं म्हंटलं आहे.

तर दुसरीकडे पोलिसांनी आपल्या कारवाईचं समर्थन केलं. तक्रार दाखल झाल्यानंतर गुन्हा दाखल केला. याचा योग्य तो तपास होईल, असं पोलिसांचं म्हणणं आहे. या सर्व वादात आता जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशा आव्हाड (Jitendra Awhad daughter Natasha Awhad) यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

नताशा जितेंद्र आव्हाड म्हणाल्या, माझ्या वडिलांवर गंभीर आरोप केला आहे. हा आरोप खूपच धक्कादायक आहे. हे आरोप चुकीचे आहेत, यामुळे आमच्या कुटुंबाला यामुळं खूप मानसिक त्रास झाला आहे. काल रात्रीपासून माझे बाबा झोपले नाहीत. कार्यकर्ते आणि नातेवाईक खूप मानसिक त्रासात आहोत.राजकारणात वाद-विवाद होत राहतात. पण, अशा आरोपांमुळं त्याचा परिणाम फक्त संबंधित व्यक्तीवर नाही,तर संपूर्ण कुटुंबावर होतो, असंही त्यांनी सांगितलं.

या तरतुदी या महिलेच्या सुरक्षेसाठी बनविण्यात आलेल्या आहेत. याचा परिणाम संबंधित महिलेवर होत आहे. याचं भान आपण ठेवलं पाहिजे. महिला सशक्तीकरणाच्या चळवळीवरही याचा परिणाम होतोय. मी याठिकाणी मुलगी म्हणून समोर आली आहे. त्यामुळं मी राजकीय काही बोलणार नसल्याचं नताशा यांनी सांगितलं.