Jitendra Awhad : “माझ्या खुनाचे षडयंत्र रचले असते तरी चाललं असतं पण… जितेंद्र आव्हाड झाले भावूक, म्हणाले.. अश्याने घरे उध्वस्त होतील”

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । राष्ट्रवादीचे आक्रमक नेते आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरोधात भाजपशी संबंधित एका महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. यानंतर राज्याचं राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. परंतू दिवसभरात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. आपल्यावर झालेल्या आरोपींनी व्यथित झालेले आव्हाड भावूक झाल्याचे आज पहायला मिळाले.

Even if the conspiracy of my murder had been hatched, it would have worked but, Jitendra Awhad got emotional

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “३०७, ३२३, हे सगळे गुन्हे मला मान्य, हे माझ्या हातून घडले आहेत आणि घडू शकतात. पण, ३५४ सारखा विनयभंगाचा गुन्हा अमान्य असून, जो मी आयुष्यात कधी केला नाही. पोलिसांनी हा गुन्हा कसा काय नोंद केला. त्या महिलेने एफआयआरमध्ये वापरलेले शब्द व्हिडीओत स्पष्ट ऐकू येत आहेत. समाजात माझी मान खाली जाईन,अशा पद्धतीचा गुन्हा दाखल करायचा हा षडयंत्राचाच भाग असू शकतो. त्यामुळे राजकारण करावं, आम्हीही केलं, पण आमदार आणि पक्षांमध्ये भेदभाव नाही केला.”

“‘हर हर महादेव’ प्रकरणी झालेल्या गुन्हाचं मला काही बोलायचं नाही. माझ्या मुलीला तिच्या मैत्रिणीने विचारलं, तुझ्या वडिलांनी विनयभंग केला आहे. इतक्या खालचं राजकारण सुरु आहे. त्यापेक्षा यात न राहिलेलं बरं. मला त्या कलमाबद्दल वाईट वाटलं. माझ्या खुनाचं षडयंत्र रचलं असते, काही वाटलं नसते. पण, ३५४ कलम मनाला लागला. मात्र, ३५४ आणि ३७६ साठी मी जन्माला आलेलो नाही. राजकारणात आक्रमकपणा नवा नाही.खालच्या पातळीवरील राजकारण महाराष्ट्रात होऊ नये. घरे उद्ध्वस्त होतील,” असे आव्हानही आव्हाड यांनी केलं.