BREAKING : पाटोद्याजवळ आयशर टेम्पो – स्विफ्ट कारचा भीषण अपघात, सहा जण जागीच ठार, वर्‍हाडी मंडळींना मृत्यूने रस्त्यातच गाठले

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे आज सकाळी आयशर टेम्पो – स्विफ्ट कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. पुण्याहून लग्नासाठी बीड जिल्ह्यातील केज येथे चाललेल्या वर्‍हाडी मंडळींना मृत्यूने रस्त्यातच गाठण्याची दुर्दैवी घटना घडली आहे. (BREAKING, Eicher Tempo-Swift car accident near Patoda, six killed on the spot in patoda accident)

BREAKING, Eicher Tempo-Swift car accident near Patoda, six killed on the spot in patoda accident

पाटोदा मांजरसुबा मार्गावर आयशर टेम्पो – स्विफ्ट कारचा भीषण अपघात झाला. पाटोदा शहराजवळील बामदळे वस्ती जवळ ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिस, नागरिक, सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य हाती घेतले होते. परंतू हा अपघात इतका भीषण होता की, स्विफ्ट कार आयशर टेम्पोत घुसली होती. या अपघातात सहा जणांवर काळाने झडप घातली.

BREAKING, Eicher Tempo-Swift car accident near Patoda, six killed on the spot in patoda accident

या अपघातात मृत्यूमुखी पडलेले सर्वजण आपल्या नातेवाईकाच्या लग्नासाठी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील जीवाचीवाडी येथे चालले होते. सर्व जण पुण्याहून लग्नासाठी निघाले होते परंतू वाटेतच त्यांना मृत्यूने गाठले.

BREAKING, Eicher Tempo-Swift car accident near Patoda, six killed on the spot in patoda accident

आयशर टेम्पोच्या खाली घुसलेली स्विफ्ट कार बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली. कार बाहेर काढताच दिसणारं दृश्य थरकाप उडवणारं होतं. गाडीतील लोकांचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता.दरम्यान घटनेतील मृतांची ओळख पटवण्याचे काम पाटोदा पोलिसांकडून सुरू आहे.