महाराष्ट्र ATS ची मोठी कारवाई : कॅनडातील वॉन्टेड दहशतवाद्याच्या संपर्कात असलेल्या खतरनाक दहशतवाद्याला मुंबईतून अटक

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । कॅनडातील वॉन्टेड दहशतवाद्याच्या संपर्कात असलेल्या एका खतरनाक दहशतवाद्याला मुंबईतून अटक करण्याची धडक कारवाई दहशतवाद विरोधी पथकाने (Maharashtra ATS) पार पाडली. या कारवाईत 30 वर्षीय दहशतवाद्याला पकडण्यात यश आले आहे.

Major action by Maharashtra ATS, dangerous terrorist Charatsingh alias Indrajitsingh Karisingh in contact with wanted terrorist in Canada was arrested from Mumbai,

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र पोलिस आणि महाराष्ट्राचे दहशतवाद विरोधी पथक विविध ठिकाणी धडक कारवाई करताना दिसत आहे. मुंबईतून चरतसिंग उर्फ ​​इंद्रजितसिंग करिसिंग या ३० वर्षीय दहशतवाद्याला अटक करण्यात यश आले आहे. (Terrorist Charatsingh alias Indrajitsingh Karisingh arrest in Mumbai) अटकेतील दहशतवादी मूळचा पंजाब येथील आहे. त्याला महाराष्ट्र एटीएसने मुंबईतून बुधवारी अटक केली. त्याला पुढील आवश्यक कारवाईसाठी पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने अटक केलेला दहशतवादी चरतसिंग उर्फ ​​इंद्रजितसिंग करिसिंग हा कॅनडामधील वाँटेड दहशतवादी (Wanted Terrorist) लखबीर सिंग लांडा याच्या संपर्कात होता, अशी माहिती महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने दिली.

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने दिलेल्या माहिती नुसार, चरतसिंग उर्फ इंद्रजितसिंग करिसिंग उर्फ कारज सिंग, (वय ३०) असे नाव असलेल्या दहशतवाद्याविरुद्ध ८ गुन्हे दाखल आहेत. मार्च २०२२ पासून तो पंजाबच्या कपूरथला तुरुंगातून २ महिन्यांच्या पॅरोल रजेवर बाहेर होता. त्याच्या पॅरोल कालावधीत त्याने त्याच्या साथीदारांसह पंजाब पोलिस, इंटेलिजेंस हेड क्वार्टर, मोहाली येथे ९ मे २०२२ रोजी रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड (RPG) ने हल्ला केला होता.

त्याच्या ठावठिकाणाबाबत महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाला माहिती मिळाली. त्यानुसार एटीएसच्या पथकाने त्याला मालाड, मुंबई येथून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, तो सध्या कॅनडामध्ये असलेल्या लखबीर सिंग लांडा नावाच्या वॉन्टेड दहशतवाद्याच्या संपर्कात असल्याचे उघड झाले आहे. पुढील कारवाईसाठी अटक केलेल्या आरोपीला पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.