भूमचा कबड्डी संघ विजेता तर जवळ्याचा नवयुग कबड्डी क्लब उपविजेता, रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जवळ्यात पार पडली कबड्डी स्पर्धा !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे युवा नेते नय्युमभाई शेख, जवळा मुस्लिम बांधव आणि नवयुग कबड्डी क्लबच्या वतीने आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत भूमच्या कबड्डी संघाने विजेतेपद पटकावले तर जवळा येथील नवयुग कबड्डी क्लबने उपविजेतेपद पटकावले.अतिशय रोमहर्षक वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेला जवळेकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला.

Bhum Kabaddi team winner and Navayug Kabaddi Club runner-up, Kabaddi tournament concluded on occasion of MLA Rohit Pawar's birthday in jawala,

यावेळी कर्जत- जामखेडचे आमदार रोहित (दादा) पवार, सभापती सूर्यकांत मोरे, काँग्रेसच्या नेत्या मंगल भुजबळ, माजी उपसभापती दीपक पाटील, जवळा सोसायटीचे चेअरमन शहाजी (आप्पा) पाटील, सरपंच सुभाष माने, माजी सरपंच प्रदीप दळवी, अक्षय वाळूंजकर, अशोक पठाडे, रणजीत पाटील, पैलवान संकेत हजारे , राहुल हजारे , तुषार काढणे, अजिंक्य पवार, संजय आव्हाड , इरफान पठाण, मुक्तार शेख, सावता हजारे, सह जवळा पंचक्रोशीतील तरुणाई मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होती.

आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड तालुक्यातील जवळा येथे भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत राज्यातील 30 संघांनी सहभाग घेतला होता. सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत स्पर्धा रंगली.

भरपावसात ही स्पर्धा सुरू होती. या स्पर्धेला जवळेकरांनी मोठा प्रतिसाद दिला.रात्री आठ वाजता आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत अंतिम सामना पार पडला. भूमचा कबड्डी संघ विरूद्ध नवयुग कबड्डी क्लब जवळा यांच्यात अतिशय चुरशी लढत झाली. या लढतीत भूम संघाने बाजी मारली. तत्पूर्वी आमदार रोहित पवार यांनी मैदानात उतरत कबड्डी खेळण्याचा आनंद लुटला. अंतिम सामन्यानंतर विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

स्पर्धेचे विजेते पुढील प्रमाणे : 1) कबड्डी क्लब भूम 2) नवयुग कबड्डी क्लब जवळा 3) कबड्डी क्लब आलेगाव 4) जामखेड महाविद्यालय

आमदार रोहित पवार यांचा नागरी सत्कार

आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कबड्डी स्पर्धेत जवळेकरांनी आमदार रोहित( दादा) पवार यांचा नागरी सत्कार केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुस्लिम समाजाचे जेष्ठ नेते रफिक भाई शेख हे होते. कबड्डी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी नवयुग कबड्डी क्लब, जवळ्यातील मुस्लिम बांधव तसेच राष्ट्रवादीचे युवा नेते तथा ग्रामपंचायत सदस्य नय्युमभाई शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य नय्युमभाई शेख यांनी आमदार रोहित दादा पवार यांच्याकडे जवळा गावातील युवकांसाठी खुल्या व्यायामशाळेची मागणी केली.नय्युम भाऊ व जवळेकरांची मागणी लवकरच पूर्ण केली जाईल असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. येत्या डिसेंबरमध्ये कर्जत- जामखेडमध्ये खेळांच्या स्पर्धेचे भव्य आयोजन करणार असल्याचे पवार यावेळी म्हणाले.