मोठी बातमी : ठरलं तर मग, फलटणचे नव्हे तर कर्जत-जामखेडचे ‘रामराजे’ होणार विधानपरिषदेचे सभापती ? | Maharashtra Legislative Council Speaker Election 2023

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । Maharashtra Legislative Council Speaker Election 2023 : राज्यात शिवसेना – भाजप- राष्ट्रवादी (अजित पवार ) या तीन पक्षांचे सरकार (BJP-Shiv sena-NCP Government) सत्तेवर आले आहे. 2023 च्या पावसाळी अधिवेशनात विधानपरिषदेचा नवा सभापती निवडला जावा यासाठीच्या हालचाली आता गतीमान झाल्या आहेत. (Monsoon Session 2023) मागील वर्षीपासून विधानपरिषद सभापतीपद पद रिक्त आहे. विधानपरिषद सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार ? याची राज्याला उत्सुकता आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार विधानपरिषद सभापतीपदासाठी (Vidhan Parishad Adhyaksh Maharashtra) भाजपकडून कर्जत-जामखेडच्या ‘रामराजेंचे’ नाव जवळपास निश्चित झाले आहे. (Ram Shinde latest news)

Maharashtra Legislative Council Speaker Election 2023, Not Phaltan but Karjat-Jamkhed's Ram Raje will be Speaker of Legislative Council? Karjat Jamkhed will get Lal Diva again, Ram Shinde supporters are excited

शिंदे-फडणवीस सरकार राज्यात सत्तेवर आल्यानंतर पहिल्या पावसाळी अधिवेशनात विधानपरिषद सभापतीपदाची निवड होईल अशी अटकळ बांधली जात होती. परंतू ही निवड लांबणीवर गेली. तेव्हापासून अनेक नावांची या पदासाठी चर्चा होती.आता सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात विधानपरिषद सभापती पदाच्या निवडीचा विषय चर्चेत आला आहे. विधानपरिषद सभापतीपदासाठी भाजपकडून आमदार प्रविण दरेकर, आमदार प्रा.राम शिंदे तर अजित पवार गटाकडून रामराजे नाईक निंबाळकर ही नावे चर्चेत आहेत. (Tajya Marathi Batmya)

राज्यात सध्या भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी (अजित पवार) गटाच्या सरकारचे संख्याबळ दोन्ही सभागृहात अधिक आहे. विधानपरिषद सभापतीपदाची निवडणूक झाल्यास भाजपचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होऊ शकतो अशी स्थिती आहे.सभागृहाच्या कामकाजावरील पकड अधिक घट्ट करण्यासाठी सभापतीपदी आपल्या पक्षाचा नेता असावा, यासाठी भाजपने हालचाली सुरू केल्या आहेत. सर्वांना सोबत घेऊन चालणारं, समन्वय राखणारं, निष्कलंक, वादग्रस्त नसलेलं, राजकीय नेतृत्व सभापतीपदी असावं असा भाजपात मतप्रवाह आहे. त्यामुळेच सभापतीपदासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या माहेरचे नववे वंशज असलेले राम शिंदे हे राज्यातील धनगर समाजातील महत्त्वाचे मोठे नेते आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची राज्याच्या राजकारणात ओळख आहे. शिंदे यांनी तत्कालीन फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेटमंत्री म्हणून काम पाहिले आहे.त्यांच्याकडे विधिमंडळीय कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. सध्या ते पक्षसंघटनेत प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेश प्रवक्ता, बारामती लोकसभा प्रभारी म्हणून काम पाहत आहेत. पक्षसंघटनेत झोकुन देऊन प्रामाणिकपणे काम करणारा, पक्ष देईल ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणारा निष्ठावंत नेता म्हणून राम शिंदे यांना राज्याच्या राजकीय वर्तुळात ओळखले जाते.

आमदार प्रा राम शिंदे हे शांत, संयमी, निष्कलंक, विकासाभिमूख, अभ्यासू, सर्वांना सोबत घेऊन जाणारं राजकीय नेतृत्व आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गुड बुकमध्ये राज्यातील ज्या मोजक्या नेत्यांना समावेश आहे, त्यात आमदार प्रा राम शिंदे यांचा समावेश आहे. ओबीसी नेतृत्व असलेल्या आमदार राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी वर्णी लागल्यास अगामी 2024 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राज्यातील धनगर समाज आणि ओबीसी समाज भाजप बरोबर राहण्याचा मोठी मदत होणार आहे.

भाजपने विधानपरिषदेच्या सभापतीपदासाठी फलटणच्या रामराजेंऐवजी कर्जत-जामखेडच्या रामराजेंची अर्थात आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती समोर येत आहे. लवकरच याबाबत पक्षाकडून अधिकृत घोषणा होणार आहे. आमदार प्रा.राम शिंदे याची विधानपरिषद सभापतीपदाची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. यामुळे कर्जत-जामखेडला पुन्हा एकदा लाल दिवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे मतदारसंघासह राज्यातील शिंदे समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.