धक्कादायक : 3 लाख रूपयांच्या लाच प्रकरणात पोलिस निरीक्षक राहूल गायकवाडसह तिघे जण एसीबीच्या जाळ्यात, पोलिस दलात उडाली मोठी खळबळ | Dhule ACB Trap News

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : नाशिक महसुल विभागातील जळगाव जिल्ह्यातून लाचखोरीचे एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका खाजगी एजंटच्या माध्यमांतून 5 लाख रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र 3 लाख रूपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड सह तिघांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेण्याची धडक कारवाई पार पाडली आहे. या कारवाईमुळे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना भुसावळ येथून उघडकीस आली आहे. (Dhule ACB Trap News)

bazar Police Station Bhusawal, PI Rahul Babasaheb Gaikwad , Rishi Durgadas Shukla, Police Naik Tushar Patil in ACB net in bribery case of 3 lakh rupees, Dhule ACB Trap News, Bhusawal latest news today,

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील एका 36 वर्षीय तरूणाच्या मित्रास भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्यात सह-आरोपी न करण्यासाठी पोलिस निरीक्षक राहुल बाबासाहेब गायकवाड (PI Rahul Babasaheb Gaikwad Bajarpeth police station Bhusawal), पोलिस नाईक तुषार पाटील (PN Tushar Patil) या दोघांनी खाजगी एजंट ऋषी दुर्गादास शुक्ला (Rushi Drugadas Shukla) याच्या माध्यमांतून तक्रारदार तरूणाकडे 5 लाख रूपयांच्या लाचेची मागणी केली. सदर तक्रारदार तरूणाने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबतची तक्रार केली होती. त्यानुसार धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज 18 जूलै रोजी सापळा लावला होता.

त्यानुसार भुसावळच्या बाजारपेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल बाबासाहेब गायकवाड (भुसावळ जिल्हा जळगाव) व पोलीस नाईक तुषार पाटील (बक्कल नंबर 303) नेमणूक बाजारपेठ पोलीस ठाणे भुसावळ जिल्हा जळगाव या दोघांच्या सांगण्यावरून व प्रोत्साहित केल्यावरून खाजगी इसम ऋषी दुर्गादास शुक्ला (रा हनुमान वाडी भुसावळ जिल्हा जळगाव) याने तक्रारदार यांच्याकडे 5 लाख रुपये लाचेची मागणी केली होती.त्यापैकी 3 लाख रूपयांची लाच रक्कम पंचांसमक्ष स्वीकारताना आज 18 रोजी त्याला रंगेहात पकडण्यात आले. यावेळी एसीबीने पोलिस निरीक्षक राहूल गायकवाड, पोलिस नाईक तुषार पाटील व खाजगी इसम ऋषी दुर्गादास शुक्ला या तिघांना ताब्यात घेतले आहे. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या कारवाईमुळे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

सदरची कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील (DYSP Abhishek Patil acb) यांच्या टीमने केली. या पथकात पो. हवा राजन कदम, पो कॉ. संतोष पावरा, पो कॉ रामदास बारेला पो. हवा चालक सुधीर मोरे यांचा समावेश होता.

यशस्वी सापळा कारवाई अहवाल

▶️ युनिट – धुळे
▶️ तक्रारदार- पुरुष, वय-36 वर्ष रा. मलकापूर जिल्हा बुलढाणा
▶️ आलोसे – 1)  राहुल बाबासाहेब गायकवाड पोलीस निरीक्षक बाजारपेठ पोलीस ठाणे भुसावळ जिल्हा जळगाव (Rahul Babasaheb Gaikwad, Police Inspector, Bazarpeth Police Station Bhusawal District Jalgaon)
2) पोलीस नाईक बक्कल नंबर 303 तुषार पाटील नेमणूक बाजारपेठ पोलीस ठाणे भुसावळ जिल्हा जळगाव (Police Naik Bakkal No. 303 Tushar Patil bazarpeth Police Station Bhusawal District Jalgaon)
3) खाजगी इसम ऋषी दुर्गादास शुक्ला, हनुमान वाडी भुसावळ जिल्हा जळगाव (Private Agent – Rishi Durgadas Shukla, Hanuman Wadi Bhusawal District Jalgaon)

▶️ लाचेची मागणी – 5,00,000/- रुपये. दिनांक 18/07/ 2023

▶️ लाच स्विकारली – 3,00,000/-रुपये. दि .18/7/2023

▶️ लाचेचे कारण – यातील तक्रारदार यांच्या मित्रास भुसावळ बाजारपेठ येथे दाखल झालेल्या गुन्ह्यात सह आरोपी न करण्यासाठी आलोसे क्रमांक 1 व आलोसे क्रमांक 2 यांच्या सांगण्यावरून व प्रोत्साहित केल्यावरून आरोपी क्रमांक 3 यांनी तक्रारदार यांच्याकडे 5,00,000/- रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी 3,00,000/- रुपये रक्कम पंचांसमक्ष स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

▶️  आलोसे यांचे सक्षम  प्राधिकारी :-
मा. पोलीस महासंचालक सो महाराष्ट्र राज्य मुंबई

▶️ सापळा अधिकारी :
अभिषेक पाटील पोलीस उप अधिक्षक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे मो नं.8888881449 (Abhishek Patil Deputy Superintendent of Police, Anti-Corruption Branch, Dhule)

▶️ सापळा पथक : पो. हवा .श्री राजन कदम
पो कॉ. संतोष पावरा, पो कॉ रामदास बारेला
पो. हवा चालक सुधीर मोरे सर्व लाप्रवि धुळे विभाग

▶️ मार्गदर्शक : मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र, नाशिक मो.न. 9371957391
मा .श्री माधव रेड्डी – अपर पोलिस अधिक्षक,
ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक. मो नं 9404333049
श्री. नरेंद्र पवार
वाचक, पोलीस उपअधीक्षक,  ला.प्र.वि. नाशिक.
मो.न. 9822627288.
——————–
याद्वारे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी, किंवा न करण्यासाठी  अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे येथे संपर्क  करावा.
दुरध्वनी क्रमांक-
02562224020
8888881449
टोल फ्री क्रमांक १०६४