करूणा मुंडेंच्या शिवशक्ती सेना पक्षाच्या राज्यातील पहिल्या शाखेचे अहमदनगर जिल्ह्यात उद्धाटन!

जामखेड टाईम्स वृत्तसेवा :  राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या पत्नी करुणा मुंडे (Karuna Munde) यांच्या शिवशक्ती सेना पक्षाची (Shiv Shakti Sena Party) महाराष्ट्रातील पहिली शाखा अहमदनगर जिल्ह्यात उघडण्यात आली आहे. करूणा मुंडे यांनी आपल्या राजकीय पक्षाचा श्रीगणेशा अहमदनगर जिल्ह्यातून केल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. (Karuna Munde’s Shiv Shakti Party’s first branch in the state in Pathardi taluka of Ahmednagar district)

करूणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंविरोधात आरोपांची राळ उठवत मध्यंतरी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली होती.  त२३ डिसेंबर २०२१ रोजी पत्रकार परिषद घेऊन नव्या पक्षाची स्थापना करणार असल्याची घोषणा केली होती. वेळ पडलीच तर पती धनंजय मुंडेंच्या विरोधात निवडणूक लढवण्याचीही तयारी असल्याचे करुणा मुंडेंनी सांगितले होते.

काही महिन्यांपुर्वी करूणा मुंडे यांनी ‘शिवशक्ती सेना’ (Shivshakti sena) या नव्या पक्षाची स्थापना केली आहे. या पक्षाचा विस्तार करण्यासाठी मुंडे ह्या राज्यभर दौरे करत आहेत. अश्यातच त्यांनी शिवशक्ती सेना पक्षाची महाराष्ट्रातील पहिली शाखा अहमदनगर जिल्ह्यात 17 मार्च रोजी उघडली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी या तालुक्यात त्यांनी पक्षाच्या पहिल्या शाखेचे उद्धाटन केले. 

पाथर्डी (Pathardi) तालुक्यातील वडगावमध्ये शिवशक्ती सेना पक्षाची राज्यातील पहिली शाखा (Vadgaon) सुरु झाली आहे. यावेळी शिवशक्ती पक्षाचे युवा नेते बाबुराव बडे, शाखाध्यक्ष संतोष बडे, उपाध्यक्ष परेमश्वर गरड, सचिव सतिश सातपुते, सल्लागार अशोक नागरगोजे, खजिनदार पै. बाळासाहेब गरड, कोषाध्यक्ष राजेंद्र शेळके यांची उपस्थिती होती. तसेच गावातील दिंगबर बडे, आजिनाथ बडे, कांता पाटील गरड, सतिष पांगरे, दत्तात्रय पांगरे आणि गावातील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.